Sugar Mill Season : पहिल्याच दिवशी उसाचा ट्रॅक्टर उलटला

कर्नाटकातील साखर कारखाने सुरू झाले असल्याने ऊस तोडणीस सुरुवात झाली आहे
Accident
Accidentesakal

सदलगा : ऊस तोडणी हंगामाच्या पहिल्याच दिवशी उसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला. सदलगा येथील कुवेंपु शाळेजवळ (गोडावून टेक) शुक्रवारी (ता. १५) रात्री ही घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवित हानी झालेली नाही.

Accident
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती - शरद पवार

याबाबत अधिक माहिती अशी, कर्नाटकातील साखर कारखाने सुरू झाले असल्याने ऊस तोडणीस सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी शुक्रवारी (ता. १५) रात्री साखर कारखान्यास ऊस घेऊन जात असताना कुवेंपु शाळेजवळ ट्रॅक्टर-ट्रॉलीचे हुक तुटल्याने दोनही ट्रॉली पलटी होऊन ऊस रस्तावर पडला. यामध्ये ट्रॉलीचे नुकसान झाले असून कोणतीही जिवीतहानी झाली नाही. चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे.

पूर्वभाग पीकेपीएसच्या गोडावूनजवळील रस्त्याला चढाव आहे. उसाने भरलेल्या दोनही ट्रॉली एकाच वेळी घेऊन जाताना ट्रॅक्टरची ताकद कमी पडते. पण तसेच ओढत नेण्याच्या चालकाच्या प्रयत्नामुळे ट्रॉली पलटी होण्याचा प्रकार घडला आहे. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या मुख्य रस्त्यावर शाळा, हायस्कूल व कॉलेज असल्याने नेहमी विद्यार्थ्यांची वर्दळ असते. दिवसा अपघात घडला असता तर विद्यार्थ्यांच्या जिवाचे काय झाले असते? अशी भीती विद्यार्थी व पालक वर्गात आहे.

Accident
...आणि मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला!

प्रमाणापेक्षा जादा ऊस भरणे, मद्यपान करून ट्रॅक्टर चालवणे, चालक परवाना नसणे, अनुभवाविना वाहन चालविण्यामुळे अपघात घडतात. यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांच्या वतीने साखर कारखाने, पोलिस ठाणे, नगरपालिका व तहसीलदार कार्यालयास प्रत्येक वर्षी निवेदन देण्यात येते. पण अजूनही यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. साखर कारखाने व पोलिस ठाण्याकडून क्षमतेपेक्षा जादा ऊस भरून वाहतूक करणाऱ्यांवर निर्बंध लादले पाहिजेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com