esakal | महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, कर्नाटकचे मुख्यमंत्री बरळले  
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka CM Yeddyurappa controversial statement on Maharashtra Karnataka border issues

महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही असे बालिशपनाचे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोड फुटले आहे. 

महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, कर्नाटकचे मुख्यमंत्री बरळले  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या नेत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घालण्याचे वक्तव्य केल्यानंतर सीमाभाग व महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सीमावाशीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.  बेंगळुरू येथे बोलताना येडीयूराप्पा यांनी महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही असे बालिशपनाचे वक्तव्य केले आहे. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना आणि सीमाभागातील जनता गेल्या 63 वर्षांपासून आपल्या मायबोलीच्या राज्यात जाण्यासाठी लढा देत असताना कर्नाटक सरकार सातत्याने मराठी भाषिकांवर अन्याय करीत आहे. 

भीमाशंकर पाटील यांच्या बेताल वक्तव्यानंतर तणाव निर्माण झाल्याने शनिवारी सायंकाळपासून दोन्ही राज्यांदरम्यानची बससेवा बंद करण्यात आली होती. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर उभे करून गोळ्या घातल्या पाहिजेत, असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. यावर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले होते. तसेच काल शिवसेनेने सीमेवर जाऊन तिरडी यात्रा काढत आंदोलन केले होते. यामुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच बेळगावमध्ये मराठी पाट्या तोडण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. यानंतर शिवसेनेने कोल्हापुरमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांचा पुतळा जाळला.

या वादावर आज येडीयुराप्पा यांनी भाष्य केले असून, महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नसल्याचे म्हटले आहे. महाजन कमिशनच्या निर्णयानुसार कोणता भाग महाराष्ट्राला द्यायचा आणि कोणता कर्नाटकला हे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे अशाप्रकारचा वाद निर्माण करणे योग्य नाही, असे ते म्हणाले. सीमेवर वातावरण तापलेले असतानाच येडीयुरप्पा यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. त्यामुळे मराठी भाषिकांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.

महाभारतात दुर्योधनाने पांडवांना जमिनीचा तुकडाही देणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर काय झाले हे जगाला माहीत आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागल्या आहेत.

loading image