पंतप्रधानांकडून  कर्नाटकचा का झाला आहे गौरव; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. 1) कर्नाटक सरकारने राज्यातील कोरोनव्हायरस परिस्थितीची उत्कृष्टपणे हाताळणी केल्याबद्दल कौतुक केले.

बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. 1) कर्नाटक सरकारने राज्यातील कोरोनव्हायरस परिस्थितीची उत्कृष्टपणे हाताळणी केल्याबद्दल कौतुक केले.

राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे व्हिडीओ लिंकमार्फत उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी कोरोनाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कर्नाटक सरकारच्या प्रयत्नांचे मी कौतुक करू इच्छितो. राज्य सरकारच्या प्रयत्नामुळेच कोरोनाव्हायरस राज्यात नियंत्रणात आहे. या लढाईत यशस्वी होण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमचे कोरोना योद्धे अजिंक्‍य आहेत आणि आमचे वैद्यकीय कर्मचारी या अदृश्‍य विषाणूविरूद्धची लढाई जिंकतील याची मला खात्री असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, राज्यपाल वजुभाई वाला, वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर आणि उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथनारायण यांनी कार्यक्रमात भाग घेतला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka honored Prime Minister