

बेळगाव : परराज्याहून कर्नाटकात (Karnatka)येणाऱ्यांसाठी कोरोनाचे दोन्ही डोस किंवा आरटीपीसीआर (रिव्हअर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर्स चेन रिॲक्शन) चाचणी सक्तीची करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आर. वेंकटेश कुमार (Venkatesh Kumar)यांनी दिली. तसेच आंतरराज्य, जिल्हांतर्गत मिळून २३ चेकपोस्ट उभारल्याचेही त्यांनी सांगितले.
आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करणाऱ्या प्रवाशांकडे 72 तासांचा अहवाल गरजेचा.
कोरोनाच्या नवीन विषाणूबाबत प्रशासकीय पातळीवर खबरदारी घेण्यात येत आहे. चाचण्या दुप्पटीने वाढविल्या जात आहेत. यासोबत आंतरराज्य प्रवासाबाबत संभ्रम आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी वेंकटेशकुमार यांनी सोमवारी (ता.२९) माहिती दिली. कर्नाटकात महाराष्ट्र, गोवा किंवा केरळहून (Maharashtra,Goa,Kerala, Karnataka)येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर किंवा कोरोना प्रतिबंधचे दोन डोस बंधनकारक आहे.
आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करणाऱ्या प्रवाशांकडे चाचणी अहवाल ७२ तासांतील हवा. जिल्ह्यामध्ये २३ चेकपोस्ट असून, यात आंतरराज्य, जिल्ह्यातील चेकपोस्ट आहेत. बेळगाव जिल्ह्याच्या सीमा गोवा, महाराष्ट्र राज्याशी जोडलेल्या आहेत. त्यामध्ये कागवाड, शिनोळी आणि कोगनोळीमार्गे सर्वाधिक वाहतूक असते. यामुळे या मार्गावर चेकपोस्ट अधिक कडक आणि तपासणी वाढविल्या आहेत. जिल्ह्यातील विविध चेकपोस्टला भेटी देण्यात आली आहे. चेकपोस्टसाठी सुमारे शंभर होमगार्डची मागणी आहे. त्याबाबत तातडीने निर्णय घेऊन नियुक्ती केली जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी वेंकटेशकुमार यांनी दिली आहे.
केरळहून अलिकडे बेळगावला विद्यार्थी आले आहेत. त्यांची कोरोना चाचणी केली जावी, असे आदेश दिले आहेत. विदेशातून किंवा परराज्यातून कोण आणि किती जण आले आहेत, त्याचा तपशिल घेत आहे. शैक्षणिक संस्थांमध्येही कोरोना चाचण्या सुरु आहेत. या दरम्यान लक्षणे आढळल्यास उपचारासह क्वारंटाईन केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.