esakal | कर्नाटक राज्योत्सव कोविड नियमावलीप्रमाणे साजरा केला जाणार : आयुक्त के. त्यागराजन I
sakal

बोलून बातमी शोधा

 आयुक्त के. त्यागराजन

कर्नाटक राज्योत्सव कोविड नियमावलीप्रमाणे साजरा केला जाणार : आयुक्त के. त्यागराजन

sakal_logo
By
विनायक जाधव

बेळगाव : कर्नाटक राज्योत्सव कोविड नियमावलीप्रमाणे साजरी केली जाणार असल्याचे शहर पोलीस आयुक्त के. त्यागराजन यांनी ट्वीटरवर ट्विट केले आहे. राज्योत्सव मोठ्याने साजरा केला जाणार या सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांना त्यांनी ब्रेक दिला आहे.

हेही वाचा: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर?

काळ्यादिनाच्या मूक सायकल फेरीला परवानगी न देताच कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संधी दिली आहे. जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी काल (ता. १२) राज्योत्सव साजरा केला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचा विपर्यास करून घेऊन काही कन्नड वृत्तपत्रांनी तसेच आततायीपणा करणाऱ्या काही कन्नड संघटननी सोशल मीडियावर याबाबतचे माहिती देत राज्योत्सव मोठ्या भव्यतेने साजरा केला जाणार असल्याची खोटी अफवा पसरविली होती.

अखेर शहर पोलीस आयुक्त त्यागराजन यांनी या अफवांना ब्रेक देण्यासाठी आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटवरून ट्विट केले असून त्यात त्यांनी राज्योत्सव भव्यतेने साजरा केला जाणार नसून कोरोना नियमावलीचे पालन करून साधेपणाने साजरा केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून खोटी माहिती देणाऱ्या कन्नड संघटनांच्या म्होरक्यांचा पाचका उडाला आहे.

loading image
go to top