कवठेमहांकाळ : बैलगाडी शर्यतींचे रविवारी आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बैलगाडी

कवठेमहांकाळ : बैलगाडी शर्यतींचे रविवारी आयोजन

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष पै. संजय (बापू) हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी ( ता. ५) मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य विना लाठी-काठी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले असल्याची माहिती प्रा. दादासाहेब ढेरे यांनी दिली.

रविवार कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते व माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शर्यतीस सुरवात होईल. बक्षीस वितरण आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर)यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमास माजी खासदार राजू शेट्टी,आमदार विक्रम सावंत,काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील,जितेश कदम, रोहितदादा पाटील, राहुल महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. शर्यतीचे संयोजन तालुका काँग्रेस कमिटी, प्रकाशबापू को-ऑप.क्रेडिट सोसायटी कुकटोळी व ग्रामपंचायत कुकटोळी यांनी केले आहे. शर्यतीचा लाभ बैलगाडी शर्यतीप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Kavathemahankaal Bullock Cart Races Organized On Sunday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top