कवठेपिरानमध्ये मानेच "हिंदकेसरी'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

हिंदकेसरी दिवंगत मारुती माने यांच्या कवठेपिरान (ता. मिरज) गावात सत्ता कायम राखण्यात त्यांचे पुतणे भीमराव माने यांनी सत्ता राखण्यात यश मिळवले आहे.

सांगली ः हिंदकेसरी दिवंगत मारुती माने यांच्या कवठेपिरान (ता. मिरज) गावात सत्ता कायम राखण्यात त्यांचे पुतणे भीमराव माने यांनी सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. त्यांनी सतरापैकी 14 जागा मिळवत गावातील सत्ता पुन्हा हस्तगत केली आहे. त्यांच्याच गटातील जुने सहकारी श्रीकांत वडगावे यांच्या पॅनेलला तीन जागा मिळाल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातील 152 गावांची निवडणूक झाली. पैकी नऊ गावे बिनविरोध झाली. 143 गावांसाठी निवडणूक लागली होती. त्यासाठी 15 जानेवारीला मतदान झाले. आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. मिरज तालुक्‍यातील मतमोजणी मिरज येथील वैरण बाजार परिसरात सुरु झाली. तेथे सकाळी आठपासून लोक जमले होते. कवठेपिरान हे मिरज तालुक्‍यातील मोठ गाव आहे.

हिंदकेसरी मारुती माने यांचे गाव म्हणून त्याचा महाराष्ट्रभर दबदबा आहे. या गावात सत्ता कुणाची येणार, याकडे लक्ष लागले होते. भीमराव माने यांना आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे काहीशी चुरस होती, मात्र राजकीय आखाड्यात कसलेल्या मल्लासारखी कुस्ती करत भीमराव माने यांनी गावातील सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे. अर्थात, या गावात भीमराव माने यांच्या विरोधात पहिल्यांदा एवढा राजकीय वणवा पेटला होता. त्या वादळात विरोधकांनी तीन जागा जिंकल्या, हेही नसे थोडके. त्यामुळे विरोधकांचा आत्मविश्‍वास काहीसा बळावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kavathepiran election result