Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Mhaisal Canal Accident Near Zurewadi : कवठेमहांकाळजवळ झुरेवाडी हद्दीत म्हैसाळ योजनेच्या कालव्यात चारचाकी कोसळून प्रसाद जाधव वाहून गेला. स्पेशल रेस्क्यू फोर्सकडून कालव्यात शोधमोहीम सुरू आहे.
Kavthemahankal youth missing canal accident

Kavthemahankal youth missing canal accident

esakal

Updated on

कवठेमहांकाळ : शहरापासून काही अंतरावर असलेल्या झुरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील हद्दीत म्हैसाळ योजनेच्या कालव्यात चारचाकी कोसळल्याने तरुण वाहून (Mhaisal canal accident in Kavthemahankal) गेला. ही घटना मंगळवारी (ता. २५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. प्रसाद जाधव (वय ३५, कवठेमहांकाळ) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, काल उशिरापर्यंत स्पेशल रेस्क्यू फोर्स तरुणाचा शोध घेत होती. झुरेवाडीजवळ घडलेल्या एका दुर्घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com