राष्ट्रवादी विरोधात स्वाभिमानीला ‘हाता’ची साथ

बाळासाहेब गणे - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

तुंग - कवठेपिरान गटात यावेळी चुरसपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे. मतदारसंघाची पुनर्रचना होऊन कवठेपिरान गटात दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, तुंग गावांचा समावेश झाला आहे. यामध्ये महिला गटाचे खुले आरक्षण आहे.

कवठेपिरान आणि दुधगाव गण येतात. दुधगाव गण खुला महिलांसाठी, तर कवठेपिरान गण ओबीसी पुरुष आरक्षित आहे. गटावर हिंदकेसरी मारुती माने यांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे भीमराव माने यांचे वर्चस्व आहे.

तुंग - कवठेपिरान गटात यावेळी चुरसपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे. मतदारसंघाची पुनर्रचना होऊन कवठेपिरान गटात दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, तुंग गावांचा समावेश झाला आहे. यामध्ये महिला गटाचे खुले आरक्षण आहे.

कवठेपिरान आणि दुधगाव गण येतात. दुधगाव गण खुला महिलांसाठी, तर कवठेपिरान गण ओबीसी पुरुष आरक्षित आहे. गटावर हिंदकेसरी मारुती माने यांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे भीमराव माने यांचे वर्चस्व आहे.

गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून भीमराव माने निवडून आले होते. आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत होते. दोन वर्षांपूर्वी श्री. माने यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हातात घेतले होते. त्यालाही सहा महिन्यांपूर्वी सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादीने अध्यक्ष निवडीत संधी असताना न मिळाल्याची सल श्री. माने यांना आहे. ते निवडणूक प्रक्रियेपासून सध्या तरी चार हात लांब आहेत.

राष्ट्रवादी आपला गड राखण्यासाठी आमदार पाटील व त्यांच्या समर्थकांचा प्रयत्न आहे. या गटात खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस व माजी आमदार संभाजी पवार समर्थक यांची आघाडी होणार आहे. गट स्वाभिमानीला, तर पंचायत समिती गण काँग्रेसला सोडल्याची चर्चा आहे. ऊसपट्टा असल्याने स्वाभिमानीची या भागात ताकद आहे. गेल्यावेळी स्वाभिमानीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. काँग्रेस, स्वाभिमानी, शिवसेना व भाजपसह सर्वांनीच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यांना मंत्री सदाभाऊ खोत यांचे बळ असेल. स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी ‘आता नाही तर कधीच नाही,’ अशी भूमिका घेतल्याने कडवी झुंज अपेक्षित आहे. मागील निवडणुकीत कवठेपिरान गणात राष्ट्रवादीचे प्रमोद आवटी यांनी स्वाभिमानीचे बाबा सांद्रेंवर विजय मिळवला होता.  गट महिलांसाठी खुला असला तरी इच्छुक संख्या मोठी आहे. स्वाभिमानीकडून दुधगावच्या सरपंच सुरेखा आडमुठे, काँग्रेसकडून सुनंदा कोळी, राष्ट्रवादीकडून सुनीता आवटी, कवठेपिरानमधून मीना पाटील, दुधगावच्या माजी सरपंच शालिनी कदम इच्छुक आहेत. दुधगाव गणात काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. यामध्ये कल्पना पाटील, सुवर्णा दळवी, जयश्री डांगे, छाया डांगे, माधुरी बिरनाळे (सर्व तुंग) हे दावेदार आहेत. राष्ट्रवादीकडून दुधगावच्या सुनीता पाटील इच्छुक आहेत. कवठेपिरान गण ओबीसी पुरुषसाठी आरक्षित आहे. गणात कवठेपिरान, सावळवाडी, माळवाडी, दुधगावचा निम्मा भाग आहे. येथे काँग्रेसकडून माजी सभापती अनिल आमटवणे (कवठेपिरान), राष्ट्रवादीकडून इकबाल तांबोळी (सावळवाडी), बजरंग सुतार, स्वाभिमानीकडून पिराजी माळी दावेदार आहेत.

भीमराव माने नाराज...
विद्यमान सदस्य भीमराव माने निवडणूक प्रक्रियेपासून लांब आहेत. झेडपी अध्यक्ष निवडीत त्यांना डावलल्याची सल कायम आहे. ते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे. विविध नेत्यांच्या भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सध्या राष्ट्रवादी विरोधकांची आघाडीची शक्‍यता आहे. मतभेद बाजूला ठेवून स्थानिक नेते एकवटल्यास रंगतदार लढत पाहावयास मिळेल.

Web Title: kawatepiran group