खानापुर तालुक्‍यात चार दिवसांत साठवण तलाव भरले तुडुंब 

दिपक पवार 
Saturday, 29 August 2020

खानापूर तालुक्‍यात चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने तालुक्‍यातील साठवण तलाव पाण्याने तुडुंब भरले आहेत. खरीप हंगामातील पिकांना मुबलक पाणी उपलब्ध आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. 

आळसंद : खानापूर तालुक्‍यात चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने तालुक्‍यातील साठवण तलाव पाण्याने तुडुंब भरले आहेत. खरीप हंगामातील पिकांना मुबलक पाणी उपलब्ध आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. 

तालुक्‍यातील भांबर्डे, लेंगरे, वाळूज, वेजेगाव, भाग्यनगर (भाकुचीवाडी ) , ढवळेश्वर , आळसंद, पारे तलाव पाण्याने भरले आहेत. भाग्यनगर, ढवळेश्वर , पारे तलाव पाण्याने पुर्णपणे भरले आहेत. पाणी सांडव्यातून वाहत आहे. वाळूज, वेजेगाव भाग्यनगर तलाव्यात मागील दोन महिन्यांपूर्वी टेंभू योजनेच्या टप्पा क्रंमाक चार मधून पाणी सोडले होते. तर भाग्यनगर, ढवळेश्वर तलावातील पाणी टेंभू योजनेचे च्या सोडले होते. आळसंद तलावात ताकारी योजनेच्या कालवा पुर्नभरणातून पाणी सोडले होते. 

परिसरातील ओढे, नदी , नाले, सिमेंट बंधारे पाण्याने भरून वाहत आहेत. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. खरीप हंगामातील ज्वारी, बाजारी, मका यासह कडधान्ये पिकांना फायदा झाला आहे. तलावातील उपलब्धत पाण्याचा खरीप प्रमाणे रब्बी हंगामातील गहू , हरभरा यासह विविध पिकांना फायदा झाला होणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून शेतकरी फळबाग लागवडीकडे अधिक वळले आहेत. डाळिंब, पेरू, सीताफळ या फळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. 

पाऊस समाधानकारक झाला आहे. शिवाय टेंभू योजनेचे पाणी परिसरातील तलावात सोडण्यात आले आहे. उपलब्ध पाण्याचा ज्वारी, बाजरी , मका , सोयाबीन यासह रब्बी हंगामातील गूह , हरभरा यासह ऊस , हळद, केळी यानगदी पिकांना पाण्याचा फायदा होईल. " 
- आण्णासाहेब निकम, शेतकरी, नागेवाडी ( ता.खानापूर ) 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Khanapur taluka, the reservoir was filled in four days