
कडेगाव : खेराडेवांगी (ता. कडेगाव) येथे अवैध दारू विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते संमत करण्यात आला. सरपंच अनिल सूर्यवंशी अध्यक्षस्थानी होते. खेराडेवांगीमध्ये अनेक दिवसांपासून अवैधरीत्या दारू विक्री सुरू होती. मद्यपींची संख्या वाढली होती. त्यांचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. विशेषतः महिलानांही याचा त्रास होत आहे.