esakal | पावसाने दिली हुलकावणी ; वाळवा तालुक्यातील खरीप पिके धोक्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Kharif crops in Valva taluka

Kharif crops in Valva taluka

पावसाने दिली हुलकावणी ; वाळवा तालुक्यातील खरीप पिके धोक्यात

sakal_logo
By
श्‍यामराव गावडे

नवखेडे - मोसमी पावसाने हुलकावणी दिल्याने वाळवा तालुक्यातील खरीप पिके धोक्यात आली आहेत नदीने तळ  गाठल्याने पाणी उपसा करणे अवघड बनले आहे.पावसाळ्याचा हंगाम असूनही पिकांना व माणसांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सून पावसाने हजेरी लावल्याने लोकांनी वेळेत पेरणी केली. उपलब्ध ओलीवर पिके तरली सुरुवातीला पोषक पाऊस मिळाल्याने पिकांची समाधानकारक वाढ झाली.संपूर्ण शिवारातील पिके सध्या भरात आहे. सध्या या पिकांच्या पोषणाला पावसाची गरज आहे. परंतु पाऊस नसल्याने या पिकांची वाढ खुंटली आहे. त्याच बरोबर उसाचे मोठे क्षेत्र असणाऱ्या तालुक्यात आडसाली लावनीचे प्रमाण जास्त असते.

वाचा - शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला 'या' तारखे पासून होणार प्रारंभ....

बहुतांश आडसाली ऊस लावणीची चांगल्या प्रकारे उगवण झाली आहे.त्यांना सध्या पावसाची गरज आहे.कोयना धरण लाभ क्षेत्रात पाऊस नसल्याने धरणातून पाणी सध्या सोडले जात नाही. त्यामुळे नदीने तळ गाठला आहे. नदीवरील उपसा सिंचन योजनांचे विद्युत पंप उघडे पडले आहेत. त्यामुळे पिकांना पाणी देणे लोकांना अवघड झाले आहे .शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय उरला नाही.