Sangli News : पावसाच्या विश्रांतीमुळे खरीप पेरण्या सुरू;कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २३९५ हेक्टर

कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील गावांसह तालुक्यात या वर्षी मॉन्सूनच्या सुरवातीलाच पावसाने धमाकेदार हजेरी लावली. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वरुणराजाची कृपादृष्टी झाल्याने शेतकरी समाधानी आहेत.
Sangli News
Sangli Newssakal
Updated on

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील गावांसह तालुक्यात या वर्षी मॉन्सूनच्या सुरवातीलाच पावसाने धमाकेदार हजेरी लावली. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वरुणराजाची कृपादृष्टी झाल्याने शेतकरी समाधानी आहेत. हा पाऊस खरीप हंगामाला वरदान देणारा ठरला आहे. घाटमाथ्यावर २३९५ हेक्टर खरीप पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. पावसाच्या विश्रांतीमुळे खरीप हंगामाच्या पेरण्या हळूहळू सुरू होणार आहेत.

मॉन्सूनने प्रारंभीच जोरदार हजेरी लावली. ओढे, बंधारे, विहिरी, तलाव जलमय झाले आहेत. पावसाने शेतात पाणी साचून राहिले आहे. उघडीप होण्यास वेळ लागणार आहे. खरीप पेरणी व हंगाम लांबण्याची शक्यता आहे. कवठेमहांकाळ मंडल अंतर्गत कवठेमहांकाळ, कुची, जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, मळणगाव, शिरढोण, लांडगेवाडी, जायगव्हाण, मोरगाव, देशिंग, बोरगाव, खरशिंग, बनेवाडी, अलकुड (एम.), हरोली, झुरेवाडी, जाधववाडी या गावांचा समावेश आहे.

घाटमाथ्यावरील शेतकरी द्राक्षांसह खरीप ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग अशी पिके घेतात. प्रतिवर्षी खरिपाच्या पार्श्वभूमीवर मेअखेरीस शेतकरी हंगामाची पूर्वतयारी व शेतीची मशागत करतात. त्यानंतर मृग नक्षत्रावर, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून खरीप पेरणीस सुरवात करतात. या वर्षी काही भागात अवकाळी, मॉन्सूनपूर्व आणि गेली चार-पाच दिवसांपासून तालुक्यात मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली. शेतात व चोहीकडे पाणी, अशी स्थिती आहे.

शेतकऱ्यांनी खरिपाच्या मशागतीची तयारी केली आहे. काही शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत मशागत केलेली नाही. सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे खरीप हंगाम पेरण्यांना वेग येणार आहे. घाटमाथा परिसरातील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, जाखापूर, कुंडलापूर, कुचीमध्ये या वर्षी वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी उघडीप मिळाली आहे. लवकरच खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे.

घाटमाथ्यावरील खरीप क्षेत्र (हेक्टर)

खरीप ज्वारी (९७०), मका (९४६), बाजरी (१२), मूग (६८), उडीद (२७५), भुईमूग (१२४). एकूण सर्वसाधारण क्षेत्र (२३९५ हेक्टर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.