खवय्यांची पंचायत ः सामान्यांचा  वडा पाव झाला गायब 

download.jpg
download.jpg
Updated on

शिराळा (सांगली) : माणूस गरीब असो व श्रीमंत घरा बाहेर पडला की त्यांला नाष्टा हवाच असतो. त्यांसाठी पहिली पसंती ही वडा पावला असते.कोरोनाच्या लॉक डाऊनमुळे वडा पाव खवय्यांची मोठी पंचायत झाली आहे. गेले 15 दिवस वडा पाव खायला न मिळाल्याने त्यांच्यावर घरीच जाऊन पाव नाही पण कोणी वडा देता का वडा असे म्हणण्याची वेळी आली आहे. वडा पाव गाडे धरकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 


माणूस गरीब असो व श्रीमंत घरा बाहेर पडला की त्यांला नाष्टा हवाच असतो. त्यांसाठी पहिली पसंती ही वडा पावला असते.त्याची किंमत ही सर्वांना परवडणारी आहे. मागणी जास्त असल्याने प्रत्येक गावात रस्तावर व चौका चौकात वडा पाव चे गाडे दिसून येतात. गरमागरम वडा पाव खाल्ला की पोटाला आधार येतो. मग दुपारी जेवणाच्या वेळे पर्यंत आपली कामे बिनधास्त सुरू राहतात. काहीजण टाइम पास म्हणून वडा पावला पसंती देत असतात. 

सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन झाले आहे. मेडिकल, हॉस्पिटल व किराणा मला दुकाने सुरू आहेत. त्यामुळे चहाच्या टपऱ्या, वडा पावचे गाडे, हॉटेल लॉक डाऊन झाले आहेत. वडा पाव हे सर्वांचे खाद्य आहे. याला मागणी जास्त असल्याने अनेकजण या व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे हा व्यवसाय गेले 15 दिवस बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

बटाटा व बेसन व्यवसायिकांची उलाढाल ठप्प झाली आहे. वडा बनवण्यासाठी बटाटा व बेसन यांचा जास्त उपयोग केला जातो. पाव बंद झाल्याने बेकरी व आटा व्यावसायिक ही अडचणीत आले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Fugitive Interception Slabs: LCB Executes Intelligence Raid Inside Karnataka Border Limits
Jat Police Inspector sp action
Why has monsoon slowed in Sangli?
How did Dr. Nagnathanna Naikwadi resolve land disputes?
Marathi News Esakal
www.esakal.com