Bullock Cart Racing : 'किंग' ठरला सांगलीचा खिलार! बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठताच खोंडांची तुफान क्रेझ; लाख-दीड लाखाचा खोंड विकला जातोय 8 लाखांत

Khillar Cattle Revival After Bullock Cart Racing Ban Lifted : बैलगाडी शर्यतींवरील बंदी हटल्याने सांगलीसह दुष्काळी भागात खिलार गोवंशाला नवसंजीवनी मिळाली आहे. खिलार बैल व गायींना लाखोंचा भाव मिळत असून शेतकऱ्यांना आर्थिक उभारी मिळत आहे.
Khillar cattle farming in Maharashtra

Khillar cattle farming in Maharashtra

esakal

Updated on

सांगली/आटपाडी : बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठल्यानंतर शेतकरी बैलगाड्यांच्या खडखडाटाने ग्रामीण भागात पुन्हा एकदा खिलार गोवंशाच्या जपणुकीकडे वळत आहेत. दुष्काळ, चाऱ्याची टंचाई आणि शर्यतींवरील बंदीमुळे संकटात सापडलेला देशी गोवंश दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी समृद्धीचा आणि आर्थिक उभारीचा नवा मार्ग ठरत आहे. दर्दी पशुपालकांकडून त्यांच्या जपणुकीकडे लक्ष दिले जात आहे. त्यामुळे त्यांचा बाजारातील दरही वधारला आहे. ‘खिलार’ ही सांगली जिल्ह्याची खास ओळख असलेला बैल ‘किंग’ (Sangli Khillar bull price) ठरतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com