उपळाई बुद्रूक येथून मुलाच्या अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न 

अक्षय गुंड
शुक्रवार, 29 जून 2018

माढ्याहून आलेल्या बोलरो गाडीतून आलेल्या अनोळखी तीन व्यक्तींनी त्याला मारहाण करत गाडीत टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न करत असतांना मुलाने धाडसाने त्यांच्या हाताला हिसका देऊन घराकडे धाव घेतली.

उपळाई बुद्रूक - मुले पळवून नेण्याच्या अफवांनी सर्वत्र हाहाकार मांडला असता माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे मुलाच्या अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न झाला. त्यामुळे माढा तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील कदमवस्तीजवळ माऊली अनिल पवार (वय १२) हा मुलगा रहात असून तो नंदिकेश्वर विद्यालयात इयत्ता सहावीचे शिक्षण घेत आहे. घरापासून शाळा ३ किलोमीटर अंतरावर असल्याने माऊली पवार हा रोजच्या ठराविक वेळेनुसार ता. २८ ला सकाळी दहाच्या सुमारास माढा-शेटफळ रस्त्यावर तो कदमवस्तीजवळ तो थांबला असता. माढ्याहून आलेल्या बोलरो गाडीतून आलेल्या अनोळखी तीन व्यक्तींनी त्याला मारहाण करत गाडीत टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न करत असतांना मुलाने धाडसाने त्यांच्या हाताला हिसका देऊन घराकडे धाव घेतली. या घटनेची माहिती माढा पोलिस ठाण्याला दिली आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: kidnapping plan failed of a boy from Uplai Budhruk solapur