

Residents of Killemachhindragad Troubled by Impure Drinking Water
Sakal
किल्लेमच्छिंद्रगड: गेल्या पाच वर्षांपासून शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या समस्येशी झगडणाऱ्या किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील नागरिकांसाठी आणखी एक धोका निर्माण झाला आहे. पाण्यात मोठ्या प्रमाणात अशुद्धता, क्षार असल्याने किडनी स्टोनचा धोका वाढला आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी ४ कोटी ३० लाख रुपयांची योजना राबविली जात असली तरी योजनेचे काम गेली पाच वर्षे होऊन गेली तरी संथगतीनेच सुरू आहे.