'यल्लमा देवी यात्रेतील प्राणी हत्या रोखा'; नवस फेडण्याच्या बहाण्याने हजारो कोंबडी, बकरी, मेंढ्यांचा दिला जातोय बळी

यात्रा आणि अन्य दिवसांत देव आणि धर्माच्या नावाने प्राणी हत्या करण्यावर पूर्णपणे निर्बंध घेण्यात आले आहेत.
Yellamma Devi Yatra at Belgaum Kokutner
Yellamma Devi Yatra at Belgaum Kokutneresakal
Summary

कोकटनूर येथील होणाऱ्या पशुबळीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. यात्रेत मोठ्या प्रमाणात पशुबळी होत असल्याने यावर निर्बंध घालावेत, अशी मागणी श्री दयानंद स्वामीजींनी निवेदनाद्वारे केली होती.

बेळगाव : कोकुटनर (ता. अथणी, जि. बेळगाव) येथील श्री यल्लमा देवीची यात्रा (Yellamma Devi Yatra) शनिवारी (ता. ६) ते ११ जानेवारीपर्यंत साजरी करण्यात येणार आहे. यात्रेप्रसंगी कर्नाटकसह महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील हजारो भक्त येत असतात. तसेच देवीला नवस फेडण्याच्या नावाने हजारो कोंबडी, बकरी, मेंढ्या आदींचा बळी देतात.

Yellamma Devi Yatra at Belgaum Kokutner
Pawangad Fort : पावनगडावरील अनधिकृत मदरसा मध्यरात्री पोलिसांकडून जमीनदोस्त, पाहा PHOTO

राज्यात कर्नाटक प्राणी हत्या प्रतिबंधक अधिनियम १९५९ (Animal Slaughter Prevention Act) आणि नियम १९६३ आणि दुरुस्ती कायदा १९७५ अंतर्गत हा शिक्षापत्र गुन्हा आहे. यात्रा आणि अन्य दिवसांत देव आणि धर्माच्या नावाने प्राणी हत्या करण्यावर पूर्णपणे निर्बंध घेण्यात आले आहेत.

Yellamma Devi Yatra at Belgaum Kokutner
काँग्रेस आमदार सतेज पाटील भाजप प्रवेश करणार? महसूलमंत्री म्हणाले, 'पक्षात येणार की नाही हे..'

यासाठी या यात्रेदरम्यान होणारी प्राणी हत्या रोखण्यात यावी, अशी मागणी विश्व प्राणी कल्याण मंडळ, बसव धर्म ज्ञानपीठ आणि पशु प्राणी बळी निर्मूलन जागृती महासंघाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांनी केली आहे. गुरुवारी (ता. ५) शहरात आयोजित पत्रकार परिषदेत स्वामीजी बोलत होते.

केवळ कोकटनूर येथील यात्रेनिमित्त होणारी पशुबळी रोखण्यात न येता राज्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या यात्रा तसेच अन्य धार्मिक नावाच्या खाली होणारी प्राणी हत्येवर निर्बंध घालण्यात यावेत. तसेच यापुढे असे प्रकार होऊन नयेत, यासाठी असे प्रकार तात्काळ रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावित, अशी मागणी यावेळी दयानंद स्वामींनी केली आहे.

Yellamma Devi Yatra at Belgaum Kokutner
पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसने जनतेचा पैसा वापरला; माजी पंतप्रधानांचा गंभीर आरोप, सिद्धरामय्या-डीकेंवर साधला निशाणा

पशुबळीवर निर्बंध

कोकटनूर येथील होणाऱ्या पशुबळीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. यात्रेत मोठ्या प्रमाणात पशुबळी होत असल्याने यावर निर्बंध घालावेत, अशी मागणी श्री दयानंद स्वामीजींनी निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी यात्रेतील पशु बळीवर निर्बंध घालण्याचा आदेश दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com