Kini toll naka traffic update
esakal
पेठ : उसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी किणी टोल नाका येथे शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पुणे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक पेठ नाका-ईश्वरपूर-सांगली मार्गे वळवण्यात आली. परिणामी पेठ नाका परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी (Peth Naka traffic jam today) झाली.