esakal | खरमाटेंचे 750 कोटींचे साम्राज्य पाहणीसाठी सोमय्या सांगलीत; अनिल परब अडचणीत?
sakal

बोलून बातमी शोधा

खरमाटेंचे 750 कोटींचे साम्राज्य पाहणीसाठी सोमय्या सांगलीत

सांगली जिल्ह्यातील बजरंग खरमाटे याची साडेसातशे कोटींची नामी बेनामी मालमत्ता नेमकी कोणाची याचा शोध घेण्यासाठी मी इथे आलो आहे

खरमाटेंचे 750 कोटींचे साम्राज्य पाहणीसाठी सोमय्या सांगलीत

sakal_logo
By
जयसिंग कुंभार,

तासगाव : अनिल परब (Anil Parab) यांचा काऊंट डाऊन सुरू झाला असून सांगली जिल्ह्यातील (Sangli Update) बजरंग खरमाटे (Bajarang Kharmate) याची साडेसातशे कोटींची नामी बेनामी मालमत्ता नेमकी कोणाची याचा शोध घेण्यासाठी मी इथे आलो आहे, असे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांनी आज येथे सांगितले. सक्त वसुली संचलनालयाने (इडी) (ED) आज खरमाटे यांना चौकशीसाठी मुंबईत बोलावले आहे. (Sangli News)

हेही वाचा: राऊतांचा शब्द खोटा ठरणार; बेळगावात 'भाजप'ची जोरदार मुसंडी

खरमाटे राज्य परिवहन विभागाचे अधिकारी आहेत. त्यांची वंजारवाडी (ता. तासगाव) येथील निवास स्थानाला भेट दिल्यानंतर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप नेते मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे उपस्थित होते. किरीट सोमय्या यांनी खरमाटे यांच्या निवासानाजवळ जावून सेल्फी घेतले. गावात त्यांच्या या दौऱ्याबाबत मोठी उत्सुकता होती.

यावेळी सोमय्या म्हणाले, 'एक आरटीओ अधिकारी एवढी संपत्ती मिळवतोच कशी? २२ कोटींचा फार्म हाऊस बांधतो कसे ? हे फार्म हाऊस अनिल परब यांची बेनामी मालमत्ता आहे का ? या प्रश्‍नांचा मी शोध घेत आहे. खरमाटे यांच्या जिल्ह्यात तीन-चार ठिकाणी घरे, जमिनी, प्लॉट आहेत. सांगली औद्योगिक वसाहतीत 5 एकर जमीन आहे. येथे 150 एकर जमीन आहे. नागेवाडी येथे मोठी फॅक्टरी आहे. आता मी जिल्हाभरातील त्यांच्या मालमत्ता पाहणार आहे.'

हेही वाचा: Live Update : बेळगावात गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज

loading image
go to top