राऊतांचा शब्द खोटा ठरणार; बेळगावात 'भाजप'ची जोरदार मुसंडी

बेळगाव महानगरपालिकेच्या मतमोजणीनंतर धक्कादायक निकाल समोर येत आहे.
राऊतांचा शब्द खोटा ठरणार; बेळगावात 'भाजप'ची जोरदार मुसंडी

बेळगाव : महापालिका निवडणूकीच्या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारली असून आतापर्यंत भाजपचे 22 तर काँगेस 4 तर महाराष्ट्र एकीकरण समितीला आता पर्यंत 3 जागा मिळाल्या आहेत. (Belgaum Election Result 2021 live) बेळगाव महानगरपालिकेच्या मतमोजणीनंतर धक्कादायक निकाल समोर येत आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या 'भाजप'ला आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे. (Live बेळगाव महापालिका निकाल)

राऊतांचा शब्द खोटा ठरणार; बेळगावात 'भाजप'ची जोरदार मुसंडी
लोकसभेनंतर महापालिका निवडणुकीत भाजपची बाजी

बेळगाव महापालिका निवडणूकीच्या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारली असून आतापर्यंत भाजपचे 22 तर काँगेस 4 तर महाराष्ट्र एकीकरण समितीला आता पर्यंत 3 जागा मिळाल्या आहेत. (Belgaum election results 2021) बेळगाव महानगरपालिकेच्या मतमोजणीनंतर धक्कादायक निकाल समोर आले आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणार 'भाजप'ला आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे. (Belgaum Municipal Election Results LIVE) आतापर्यंत भाजपचे 15 उमेदवार विजयी झाले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक प्रभागात समितीला पराभव स्वीकारावा लागला असून समितीचे अनेक उमेदवार कमी मताधिक्याने पराभूत झाले आहेत. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार विजय असल्याचे दिसून येत होते. मात्र अखेरच्या फेरीत समितीचे उमेदवार पराभूत झाले आहेत.

राऊतांचा शब्द खोटा ठरणार; बेळगावात 'भाजप'ची जोरदार मुसंडी
Live Update : बेळगावात 'भाजप'ची जोरदार मुसंडी

आतापर्यंत तीन ठिकाणी महाराष्ट्र समितीचे उमेदवार विजयी झाले असून उर्विरित निकालांकडे मराठी भाषिकांचे लक्ष लागले आहे. विजयी उमेदवार जल्लोष करत असून येत्या दोन दिवसांत सर्व निकाल हाती येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com