Sangli Crime
sakal
कवठेमहांकाळ: येथे पोलिस ठाण्यानजीक एका शासकीय कार्यालयासमोर मंगळवारी रात्री आठच्या सुमारास फिल्मी स्टाईलने चाकू हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मोहसीन जमादार (वय ३७, कोंगनोळी) हल्ल्यात गंभीर जखमी झाले. रवी खत्री, प्रदीप मोरे, लोकेश नाईक, महादेव भंडारी, सोमनाथ डवरी, साहिल डफेदार, सत्तार महात (सर्व सांगली), अतुल कांबळे (कोंगनोळी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मोहसीनने फिर्याद दिली.