वडाचे महत्त्व जाणून संवर्धनाचा धागा बांधूया

सुनील गर्जे
बुधवार, 27 जून 2018

नेवासे: वटपौर्णिमेला महिलांच्या लेखी खास असे महत्त्व असते. 'जन्मो जन्मी हाच पती मिळू दे' ही भावना वडाच्या झाडाला धागा बांधणार्यात सुवासिनींची असते. मात्र, आता बदललेला काळ लक्षात घेतला तर महिलांनी केवळ पतीसाठी नव्हे, तर कुटुंबाच्या भवितव्यासाठी झाडांचे संवर्धन करण्याची शपथ घ्यायला हवी. 

सध्या सगळीकडे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि त्याच्या संवर्धनासाठीच्या उपाययोजनेवर चर्चा सुरू होत असताना केवळ त्याची चर्चाच न होता वृक्ष संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. रस्ता रुंदीकरणासाठी व सध्या प्लॉटिंगच्या व्यावसायामुळे जागा विकशीत करण्याच्या नावाखाली शहर, गावालगतचे या सर्व झाडांवर कुर्हाड पडली आणि एकेकाळी गर्द झाडीने नटलेले हे मार्ग आता उजाड झाले आहेत.

आता पुन्हा एकदा शहरासह गावागावातील मोठय़ा वृक्षांचे जतन करण्यासाठी नागरिकांनी पाउल उचलणे पाहिजे. वडाचे झाड सतत प्राणवायू सोडण्याचे काम करत असते. त्यामुळे किमान दोन वडाची झाडे लावायली हवीत व त्याची जपणूक करण्याचे बंधन केले तर निसर्गाचा समतोल राखला जाणार आहे.

फांद्याची नको, वडाच्या झाडाचीच करा पूजा
वटपौर्णिमेला झाडाची पूजा करण्यापेक्षा झाडाच्या फांद्याची पूजा करण्याकडे महिलांचा ओढा असतो पण, फांद्या तोडून झाडाला इजा पोहोचविण्यापेक्षा झाडाचेच पूजन करण्याला महिलांनी प्राधान्य द्यायला हवे.

"भारतीय संस्कृतीने पंचमहाभूतात देव पाहिला आहे. त्यात झाडही आहे.या भूतलावर सर्वात दीर्घायुष्यी वटवृक्ष असून वटपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येकांनी एकतरी वटवृक्ष लावावे. 
-पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्शगाव प्रकल्प व संकल्प समिती.

Web Title: know the importance of the Banyan Tree