RT-PCR विना कर्नाटकात प्रवेश देऊ नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पोलिस प्रमुखांची भेट; कोगनोळी नाक्यावर बंदोबस्त कडक
RT-PCR विना कर्नाटकात प्रवेश देऊ नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Updated on

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्याला रविवारी (१) बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ व जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र व इतर राज्यातून येणाऱ्या चारचाकी वाहनधारकांना आरटी-पीसीआर रिपोर्ट असल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश देऊ नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नाक्यावर पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.

RT-PCR विना कर्नाटकात प्रवेश देऊ नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
'केवळ घोषणा देणारे महाविकास आघाडीचे सरकार'

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ व जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी या सीमा तपासणी नाक्यावर सुरू असलेले काम पाहून समाधान व्यक्त केले. सध्या कोगनोळी फाट्यावर सुरू असणारा तपासणी नाका येथील दूधगंगा नदीवर सुरू करावा, अशा सूचना दिल्या. शनिवार (31) पासून या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा दाखला दाखवल्यानंतर सोडली जाणारी वाहने बंद केली आहेत.

RT-PCR विना कर्नाटकात प्रवेश देऊ नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
तेरा यार हूँ मै...! सोशल साइट्‌सवरही निभावली ‘यारी’

महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटी-पीसीआर रिपोर्टची पाहणी करूनच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. शनिवारी (31) अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे अनेक वाहनधारकांची गैरसोय झाली होती. त्यामुळे कोगनोळी फाटा ते दूधगंगा नदीपर्यंत चारचाकी वाहनांची गर्दी झाली होती. यावेळी चिक्कोडीचे प्रांताधिकारी युकेश कुमार, निपाणीचे तहसीलदार डॉ. मोहन भस्मे, मंडल पोलिस निरीक्षक एस. व्ही. शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, कोगनोळी ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, अमर चंदनशिव यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam released water through its spillway gates for the first time this monsoon after the reservoir level increased due to continuous rainfall.
RBI penalty on Sangli District Central Cooperative Bank
Almatti Dam Supreme Court dispute
Shashikala Jolle complaint to Nitin Gadkari
Marathi News Esakal
www.esakal.com