'केवळ घोषणा देणारे महाविकास आघाडीचे सरकार'

'केवळ घोषणा देणारे महाविकास आघाडीचे सरकार'

पूरग्रस्तांच्या मदतीबाबत त्यांनी केवळ घोषणा न करता मदतीबाबत भरीव तरतूद करावी

कोनवडे : राज्यातील महाविकास आघाडीचे (mahavikas aaghadi) सरकार केवळ घोषणा करणारे आहे. पूरग्रस्तांच्या (flood) मदतीबाबत त्यांनी केवळ घोषणा न करता मदतीबाबत भरीव तरतूद करावी, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (samarjitsinh ghatge) यांनी केले. कूर (ता. भुदरगड) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'केवळ घोषणा देणारे महाविकास आघाडीचे सरकार'
पूरग्रस्तांना भरपाईसाठी विमा कंपन्यांनी टाळाटाळ केल्यास कडक कारवाई करा

यावेळी कोळवण, कोनवडे, निळपण गावात पुरामुळे झालेल्या पिकांच्या व घरांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. घाटगे म्हणाले, ‘‘अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना शासनाने नुकसानभरपाई ताबडतोब द्यावी. पूर ओसरून दहा दिवसांचा कालावधी लोटला तरी शासन पातळीवर पंचनामे सुद्धा पूर्ण झालेले नाहीत. शासनाच्या उदासिन भूमिकेमुळे नुकसानग्रस्त नागरिक वाऱ्या‍वर आहेत. शासनाने आजपर्यंत केवळ घोषणा केल्या आहेत. यावेळी शासनाने आर्थिक तरतूद करावी व नुकसानग्रस्तांना ती ताबडतोब द्यावी.’’

'केवळ घोषणा देणारे महाविकास आघाडीचे सरकार'
तेरा यार हूँ मै...! सोशल साइट्‌सवरही निभावली ‘यारी’

यावेळी राहुल देसाई, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणसिंह सावंत, किसान मोर्चाचे भगवान काटे, सरपंच दत्तात्रय हळदकर, देवराज बारदेस्कर, युवा मोर्चा राज्य चिटणीस अलकेश कांदळकर, वसंतराव प्रभावळे, रणजीत आडके, नामदेव चौगले, विद्यार्थी परिषदेचे पार्थ सावंत, तालुकाध्यक्ष विनायक परुळेकर, शहराध्यक्ष प्रकाश वास्कर, युवराज पाटील, तालुका सरचिटणीस अनिल तळकर, सुमित चौगले, विनायक शिंदे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com