Kolhapur contractor bribery allegations
esakal
Kolhapur corruption scandal latest news: शासकीय कामांच्या कंत्राटांसाठी आमदार, अधिकारी तसेच विविध स्तरांवर टक्केवारी द्यावी लागते. ही कीड नष्ट झाली पाहिजे. कंत्राटदारांनी बिले काढण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी टक्केवारी देऊ नये, असा सूर आज येथे महाराष्ट्र स्टेट गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या पहिल्या अधिवेशनात उमटला. थकीत बिले मिळेपर्यंत नवीन कामे करू नयेत आणि कोणी करत असल्यास ती बंद पाडावीत, असा निर्धारही यावेळी करण्यात आला.