महापूर झेलूनही राज्यात कोल्हापूरच भारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

महापूर, अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसूनही यावर्षीच्या साखर हंगामात राज्यात कोल्हापूर विभागच भारी ठरला आहे. ऊस गाळप आणि साखर उत्पादनात आघाडी घेतलेल्या कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्यातील आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे. 

कोल्हापूर   ः महापूर, अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसूनही यावर्षीच्या साखर हंगामात राज्यात कोल्हापूर विभागच भारी ठरला आहे. ऊस गाळप आणि साखर उत्पादनात आघाडी घेतलेल्या कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्यातील आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे. 

कोल्हापूर विभागात कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याच समावेश आहे. या दोन जिल्ह्यात गेल्यावर्षी महापुराचा मोठा फटका ऊस पिकाला बसला. त्यानंतर अवकाळी पावसानेही या दोन जिल्ह्यात धुमाकुळ घातला. या संकटामुळे ऊस उत्पादक शेतकरी कोलमडून पडला. कोल्हापूर जिल्ह्यात तर नदीकाठचा ऊस पंधरा दिवसापेक्षा जास्त पाण्याखाली होता. त्याचा परिणाम साखर हंगामावर होण्याची शक्‍यता होती. या नैसर्गिक संकटामुळे यावर्षीचे या दोन्हीही जिल्ह्यातील गाळप आणि साखर उत्पादनही घटण्याची चिन्हे आहेत. पण आतापर्यंत राज्यात झालेल्या एकूण गाळपात कोल्हापूर विभागाने बाजी मारली आहे. 

राज्यात 75 सहकारी व 65 खासगी तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात मिळून 24 सहकारी व 10 खासगी अशा 34 कारखान्यांनी यावर्षीचा हंगाम घेतला आहे. कोल्हापूर विभागाची दैनंदिन गाळप क्षमता 1 लाख 67 हजार 300 मेट्रीक टन आहे. राज्यात 23 नोव्हेंबरपासूनच हंगामाला सुरूवात झाली. तथापि या दोन जिल्ह्यातील बहुंताशी कारखाने 2 डिसेंबरनंतरच सुरू झाले आहेत. गेल्या महिन्याभरात कोल्हापूर विभागात 68.14 लाख मेट्रीक टन ऊस गाळप होऊन 76.91 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले. विभागाचा साखर उतारा 11.29 इतका आहे. 

 
दृष्टीक्षेपात राज्याचे गाळप (माहिती 7 जानेवारीपर्यंतची) 

विभाग कारखाने  गाळप  साखर उत्पादन  उतारा 

जिल्हा      सहकारी  खासगी   एकूण  मे टनमध्ये  लाख क्विंटलमध्ये टक्के 

कोल्हापूर       24     10          34       68.14     76.91  11.29 

पुणे             18        11        29        53.97      56.26  10.42 

सोलापूर        8        16          24        26.69    24.45  9.16 

नगर           11          5         16       25.97    24.27    9.35 

औरंगाबाद     9       10         19      15.47     13.64     8.82 

नांदेड           5          8          13     9.69      9.44       9.74 

अमरावती       0      2             2     1.99      1.80       9.07 

नागपूर           0     3            3       0.90         0.74   8.26 
 

एकूण          75       65      140    202.81      207.51  10.23 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur district top in Sugar production