#KolhpaurFloods पडलेले घर कसे उभे करायचे हाच मोठा प्रश्न

संजय खुळ
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

" पुराने सगळेच वाहून गेले आहे आयुष्यभर ज्या घरात राहत होतो, ते घरी जमीनदोस्त झाले आहे. शासकीय मदत कधी आणि किती मिळणार याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत घर-कुटुंब कसे उभा करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे."
- बाबासो कुंभार, पूरग्रस्त

इचलकरंजी - पूर ओसरला हळूहळू पूरग्रस्त घराकडे परतू लागले मात्र घराची एकूणच परिस्थिती पाहून त्यांचे मन प्रचंड अस्वस्थ झाले आहे. पडलेल्या भिंती, मोडकळीस आलेले संसारोपयोगी साहित्य, जमिनदोस्त झालेला जनावराचा गोटा हे सगळेच भयावह चित्र पूरग्रस्तांची धडकी भरणारे ठरले आहे .जनावरे सहित आपण राहायचे कुठे असा मोठा प्रश्न हातकणंगले तालुक्यातील अनेक पूरग्रस्तांना पडला आहे.

महापुराने हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात मोठे थैमान घातले पाणी वाढू लागले तसे दोन-चार पिशवी जेवढे साहित्य मावेल तेवढे घेऊन शेतमजूर शेतकरी आणि कष्टकरी वर्ग बाहेर पडला. सार्वजनिक ठिकाणी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी त्यांनी आठ-दहा दिवस काढले पूरग्रस्ता म्हणून त्या ठिकाणी सोय  झाली. मात्र भविष्याचं काय असाच मोठा प्रश्न या कष्टकरी वर्गाला पडला आहे.

दोन बाजूच्या भिंती पडलेल्या, दार  उघडतच नसल्याने ते मोडून काढूनच  आत अनेकांनी प्रवेश केला. आतील एकूण स्थिती पाहून हा कष्टकरी वर्ग प्रचंड खचलेला आहे. शासनाकडून किती मदत मिळणार आणि त्यात आयुष्यभर उभारलेले आपले घराचे स्वप्न पूर्ण होणार काय अशी आशा त्यांच्यात निर्माण झाले आहे.कष्टकरी वर्गाची ही एकूण स्थिती अत्यंत वेदनादायी अशी ठरले आहे.

" पुराने सगळेच वाहून गेले आहे आयुष्यभर ज्या घरात राहत होतो, ते घरी जमीनदोस्त झाले आहे. शासकीय मदत कधी आणि किती मिळणार याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत घर-कुटुंब कसे उभा करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे."
- बाबासो कुंभार,
 पूरग्रस्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Floods Babasaheb Kumbhar special story