#KolhapurFloods राजापूर दुर्घटनेच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या

संजय खुळ
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

इचलकरंजी - सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे घडलेल्या दुर्घटनेने 2005 मध्ये शिरोळ तालुक्यातील राजापूर या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. राजापूर येथील पूरग्रस्त यांत्रिक बोटीने जात असताना बोट उलटून तब्बल चौदा जण ठार झाले होते. आजही या गावाला प्रत्येक वर्षी पूर आले की या कटू आठवणीने मन अस्वस्थ होते.

इचलकरंजी - सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे घडलेल्या दुर्घटनेने 2005 मध्ये शिरोळ तालुक्यातील राजापूर या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. राजापूर येथील पूरग्रस्त यांत्रिक बोटीने जात असताना बोट उलटून तब्बल चौदा जण ठार झाले होते. आजही या गावाला प्रत्येक वर्षी पूर आले की या कटू आठवणीने मन अस्वस्थ होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अनेक गावात 2005  महापुराने हाहाकार माजला होता. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संततधार पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात सुरू होता. नेहमीप्रमाणेच  नदीला पूर आले तर आपल्या गावाच्या वेशीपर्यंत येईल अशीच भावना शिरोळ तालुक्यातील अनेक गावांची होती. मात्र 25 जुलै ची ती काळ रात्री ठरली.

प्रचंड वेगाने धो-धो पडणारा पाऊस आणि वेगाने वाढणारे नदीचे पाणी यामुळे 26 जुलै ची सकाळ अनेकांना पाण्यातच पहावे लागले. घराभोवती चौफेर पाणी आणि पाण्याचा प्रचंड वेग यामुळे अनेक गावे हडबडून गेली होती. राजापूर या छोट्याशा गावाला संपुर्ण पाण्याने वेढले होते.साध्या बोटीने नागरिकांना बाहेर काढणे अशक्य होते. सैन्यदलाचे यांत्रिक बोट मदतीसाठी याठिकाणी आले होते. राजापूर येथील अनेक नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सकाळपासूनच यांत्रिक बोटीने सुरू होते.

दुपारी दलित वस्तीतील अनेक घरातील माणसांना घेऊन ही बोट टाकळीच्या दिशेने जाऊ लागली. यामध्ये राजापूर येथील 14 जणांचा समावेश होता तर एकाच कुटुंबातील पाच जण या बोटीमध्ये होते. बोट प्रचंड पाण्याचा वेग कापीत पुढे पुढे जात असताना अचानक पुढे एक बाबळीचे झाड आले. या झाडाची काटे आपल्याला लागणार  असे अनेकांना भीती वाटू लागले आणि या गोंधळातच भरधाव येणाऱ्या या बोटीतील काही महिला एका बाजूला झाल्या. बोटीचा तोल बिघडल्याने बघता-बघता उलटी झाली आणि 14 जणांना जलसमाधी मिळाली .यातील काहींची मृतदेह शेवटपर्यंत मिळालेच नाहीत.

तालुक्यात 2005 ची ही झालेली दुर्घटना लक्षात घेऊन या वेळी मात्र प्रशासनाने अत्यंत दक्षता घेतली होती .तालुक्यातील तब्बल एक लाख 47 हजार नागरिकांची तर तीस हजार अधिक जनावरांचे स्थलांतर करण्यात आले.मात्र प्रत्येक काम थोडे उशिरा पण अत्यंत नियोजनबद्ध रीतीने करण्यात आले .असे असतानाच पुन्हा काल सांगली जिल्ह्यातील दुर्घटना राजापूरच्या दुर्घटनेला राजापूर येथील कटू आठवणींना पुन्हा पुढे आणली.

चार दिवसापूर्वी राजापूर या ठिकाणी पुन्हा पावसाच्या पाण्याने वेढले. यावेळी प्रशासनाने घेऊन आलेल्या बोटीत बसण्यास सुरुवातीस नागरिकांनी नकारच दिला. मात्र घराबाहेर पडण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे नागरिकांनी भीतभीतच पुन्हा या यांत्रिक बोटीतून प्रवास करून गावा बाहेर पडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Floods Sad memories of Rajapur accident woke up again