
सांगली : शहरातील शिवशंभो चौकातील एका बंगल्यात आज घरगुती कार्यक्रम सुरू होता. दुपारच्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील एक जण कार्याक्रमासाठी आला. सोबत त्याने पकडून आणलेले मगरीचे पिल्लूही प्लॉस्टिकच्या बाटलीतून घेवून आला. ही बाब प्राणीमित्र कौस्तुभ पोळ निर्दशानास आली. वन्यजीवाची हेळसांड होत असल्याचा आरोप करत तातडीने सांगलीच्या वनविभागास कळवले.