कोल्हापूरच्या महापौर गवंडी उद्या सभेत देणार राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - महापौर माधवी गवंडी उद्या (ता. 3) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत राजीनामा देणार आहेत. काहीही असूद्या ठरल्याप्रमाणे राजीनामा द्या, असा आदेशच पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.

कोल्हापूर - महापौर माधवी गवंडी उद्या (ता. 3) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत राजीनामा देणार आहेत. काहीही असूद्या ठरल्याप्रमाणे राजीनामा द्या, असा आदेशच पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.

दरम्यान, महापौरांनी राजीनामा दिला तर नव्या महापौरपदासाठी निवडणूक घेता येईल किंवा नाही, याबाबत आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी नगरविकास खात्याकडे मार्गदर्शन मागविले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर उद्या (ता. 3) सर्वसाधारण सभा होत आहे. 

दरम्यान, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच केएमटी व इतर कर्मचाऱ्यांचेही प्रस्ताव द्या, असे म्हणत गतवेळच्या सभेत सातव्या वेतन आयोगाला मान्यता देण्याचा प्रस्ताव पुढे ढकलला होता. तो प्रस्ताव अद्यापही परिपूर्ण होउन आलेला नाही. किती बोजा पडणार हे स्पष्ट नाही. त्यामुळे सातव्या वेतन आयोग लागू करण्यास महासभेची मान्यता देण्याच्या प्रस्तावाची मंजुरीही लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. 

महापौर माधवी गवंडी यांची 2 जुलैला महापौरपदी निवड झाली होती. नाट्यपूर्ण घडामोडीनंतर सूरमंजिरी लाटकर यांच्याऐवजी गवंडी यांना संधी दिली. ही संधी देतानाच आमदार हसन मुश्रीफ यांनी दोन महिन्यासाठीच हे पद त्यांना दिले होते. माधवी गवंडी यांनीही हा शब्द पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या उद्या सभेत राजीनामा देणार आहे. 

राज्य शासनाने नुकताच आदेश काढून मुदत संपलेल्या महापौर, उपमहापौर तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड तीन महिने लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे या आदेशाचा परिणाम मुदतीपूर्वी राजीनामा देणाऱ्या महापौर, उपमहापौर निवडीवर काय होतो? याकडे लक्ष आहे. ही संभ्रमावस्था दूर करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी राज्यशासनाच्या नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागतिले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Mayor Madhavi Gavandi will resign tomorrow