कोल्हापूर महापालिकेचे बाराशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर

विकास कांबळे
बुधवार, 7 मार्च 2018

कोल्हापूर - महापालिकेचे 2017-18 चे सुधारीत व 2018-19 चे महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प, वित्त आयोग असे सर्व मिळून 1159 कोटी 9 लाख 17 हजार 133 रुपयाचे अंदाजपत्रक आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांना आज सादर केले.

कोल्हापूर - महापालिकेचे 2017-18 चे सुधारीत व 2018-19 चे महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प, वित्त आयोग असे सर्व मिळून 1159 कोटी 9 लाख 17 हजार 133 रुपयाचे अंदाजपत्रक आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांना आज सादर केले. स्थायी समितीमध्ये यावर चर्चा होऊन येत्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे अंदाजपत्रक सादर करण्यात येईल. 

अंदाजपत्रकात महापालिकेचे मुख्य नवीन प्रशासकीय इमारत, ई गर्व्हंनन्स, वायफाय सीटी, मॉडेल स्कुल, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, ग्रीनबेल्ट, मॉडेल गार्डन यावर अधिक भर देण्यात आला आहे. महापालिकेला यावर्षी कर्ज काढावे लागणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. वर्षाला साधारणपणे महापालिकेच्या उत्पन्नातून प्रभागातील सुविधांसाठी साधारणपणे 80 ते 90 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. 

महसुली व भांडवली जमेच्या बाजुने 577 कोटी 24 लाख 28 हजार 856 रुपये अपेक्षित रक्‍कम दाखविण्यात आली असून खर्चाच्या बाजुने 573 कोटी 9 लाख 49 हजार रुपये दाखविण्यात आले आहेत. 4 कोटी 14 लाख 79 हजार 856 रुपये अपेक्षित शिल्लक दाखविण्यात आली आहे. विशेष प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामांचे जमा खर्चाचे अंदाजपत्रक स्वतंत्रपणे जोडण्यात आले आहे. यात 546 कोटी 84 लाख 62 हजार 682 रुपये जमेच्या बाजुने तर 538 कोटी 89 लाख रुपये खर्चाच्या बाजुने दाखविण्यात आले आहेत.

महिला व बालकल्याण निधी आणि केंद्रिय वित्त आयोगाचे एकत्रित स्वतंत्र अंदाजपत्रकात दर्शविण्यात आले आहे. वित्त आयोगाअंतर्गत 35 कोटी 25 हजार 595 रुपये अपेक्षीत जमा असून 33 कोटी 22 लाख अपेक्षित खर्च आहे. याप्रमाणे महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प वित्त आयोग मिळून 1159 कोटी 9 लाख 17 हजार 133 रुपये इतका जमेचे अंदाजपत्रक आहे. 
 

Web Title: Kolhapur News 12 cores corporation budget

टॅग्स