गगनबावडा-कळेजवळ पुराचे पाणी आल्याने मध्यरात्रीपासून अडकले 250 प्रवासी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

पाच खासगी बस पुराचे पाणी आल्याने काल (गुरुवार) रात्री 1 वाजल्यापासून गगनबावडा - कळेमधील भागामध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे. या बसमध्ये सुमारे अडीचशे प्रवासी आहेत

कोल्हापूर - गोवा येथून कणकवली, गगनबावडामार्गे पुण्याला जाणाऱ्या पाच खासगी बस पुराचे पाणी आल्याने काल (गुरुवार) रात्री 1 वाजल्यापासून गगनबावडा - कळेमधील भागामध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे. या बसमध्ये सुमारे अडीचशे प्रवासी आहेत.

यांपैकी एक असलेले प्रवासी मयांक टेंगशे यांच्याकडून सकाळला ही माहिती देण्यात आली आहे. या अडकलेल्या प्रवाशांना मदत हवी असल्याचे स्पष्ट झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news; 250 travelers stranded due to flood water

टॅग्स