जावयाची वरात थेट पोलिसांच्या दारात

जावयाची वरात थेट पोलिसांच्या दारात

कोल्हापूर - सासुरवाडीत इंप्रेशन मारण्यासाठी बुलेट चोरी करणाऱ्या जावयाची वरात थेट पोलिस ठाण्यात पोचली. जयदीप शहाजी पाटील (वय २२, मूळ रा. कुरळप, ता. वाळवा, सध्या रा. कळंबा) असे संशयिताचे नाव असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की जयदीप पाटील याचा वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. यापूर्वी तो पत्नीसह गणपतीपुळे येथे एका जहाजावर नोकरी करीत होता. नोकरी सोडून तो कोल्हापुरात आला. लग्नाच्या वाढदिनी सातारा येथील सासुरवाडीत पत्नीला घेऊन बुलेटवरून जायचे आणि इंप्रेशन मारायचा मोह त्याला आवरला नाही. तो बुलेट मिळविण्याच्या शोधात होता.

दरम्यान कावळा नाका येथे एक बुलेटचे सर्व्हिसिंग सेंटर आहे. येथे शनिवारी (ता. २६) पंडित बापू सुतार (वय ४८, रा. शेंडूर, ता. कागल) यांनी आपली बुलेट सर्व्हिसिंगला पाठवली होती. त्यांचा मुलगा अवधूत आणि भाचा बुलेट घेऊन सर्व्हिसिंग सेंटरवर गेले होते. त्या वेळी तेथे पाळतीवर असणाऱ्या जयदीपने दोघांना आपण सर्व्हिसिंग सेंटरचा कर्मचारी असल्याचे भासवून बुलेटची ट्रायल घेऊन येतो, असे सांगून गेला होता. बराच वेळ झाला, तरी बुलेट घेऊन परतला नाही. त्यामुळे सुतार यांच्या मुलाने व भाच्याने सर्व्हिसिंग सेंटरमध्ये चौकशी केली; मात्र असा कोणताही कर्मचारी आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सुतार यांनी बुलेट चोरीची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला. सीसीटीव्हीत बुलेट घेऊन चोरटा नाक्‍याबाहेर साताऱ्याच्या दिशेने गेल्याचे आणि काल (ता. २८) पुन्हा शहरातून कळंबा येथे गेल्याचेही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानुसार पोलिसांनी सायंकाळी कळंबा येथे सापळा रचला. तेथे जयदीप बुलेटवरून जाताना त्यांना मिळून आला. त्याला अटक केली. त्याच्याकडून बुलेटही जप्त केली.

‘इंप्रेशन’ पडले महागात
प्रेमविवाहाच्या पहिल्या वाढदिनी सातारा येथील सासुरवाडीत पत्नीला बुलेटवरून घेऊन जायचे. सासुरवाडीत इंप्रेशन मारायच्या मोहातून बुलेट चोरल्याची कबुली संशयित जयदीप पाटीलने दिल्याचे पोलिस उपनिरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com