बीडमधील भामट्याचा बारा बैलांसह पोबारा 

वि. म. बोते
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

कागल -  बैलांची खरेदी करून तीन लाख 97 हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद कागल पोलिसांत दाखल झाली आहे. सत्तार युनूस पठाण (साखरवाडी, ता. केज, जि. बीड) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद अस्लम बाबालाल शेख (करनूर ता. कागल) यांनी कागल पोलिसांत दिली. 

सत्तार पठाण हा गेली चार वर्षे जनावरे खरेदी-विक्रीच्या व्यवसायानिमित्त अस्लम यांच्या परिचयाचा झाला. साखर कारखाना हंगाम सुरू असल्याने बैलांची गरज असल्याचे सांगून अस्लम शेख यांच्याकडील बारा बैल खरेदी केले. यापोटी त्याने 20 हजार रुपये शेख यांना दिले. उर्वरित तीन लाख 97 हजार रुपये नंतर देतो, असे सांगून तो निघून गेला. हा व्यवहार 19 ऑक्‍टोबरला झाला. त्यानंतर पठाणकडून पैसे न मिळाल्याने अस्लम शेख यांनी मित्र शशिकांत घाटगे यांना बरोबर घेऊन पठाण याचे गाव गाठले; मात्र तेथे तो सापडला नाही. अस्लमकडून नेलेले बैल काहींच्या दारात दिसून आले. तेथे चौकशी केली असता त्या माणसांनी ती पठाणकडून खरेदी केल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अस्लम शेखने कागल पोलिसांत सत्तार पठाण याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आय. एम. शिंदे तपास करीत आहेत. 

Web Title: Kolhapur News Crime report