कागल पालिका आग घटनेची शहानिशा करा, अन्यथा उपोषण - मुश्रीफ

वि. म. बोते
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

कागल - "कागल नगरपालिकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आहे, याचा खुलासा पोलीसांनी लवकर करावा. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमावी. या घटनेची शहानिशा झालीच पाहिजे, अन्यथा नगरसेवकांसह पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसावे लागेल. असे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कागल - "कागल नगरपालिकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आहे, याचा खुलासा पोलीसांनी लवकर करावा. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमावी. या घटनेची शहानिशा झालीच पाहिजे, अन्यथा नगरसेवकांसह पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसावे लागेल. असे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री मुश्रीफ म्हणाले, कागल नगरपालिकेला लागलेली लाग दुर्दैवी घटना आहे. वादाचा विषय होणार हे गृहीत धरले. भाजपने केलेल्या आरोपात तथ्य नाही अशी गोलमाल उत्तरे देणे योग्य नाही. जनतेच्या मनातील संभ्रम दूर होणे महत्त्वाचे आहे. घरकूलचे पाप झाकण्यासाठी व गुंठेवारी प्रकरणे असे दोन आरोप भाजपने केले. त्यापैकी घरकुलाचे काम काही वर्षे सुरु आहे. याबाबत माहितीच्या अधिकारात विरोधकांना दोन वेळा माहिती दिली. त्याचा डाटाही शिल्लक आहे, म्हाडाकडेही त्याची प्रत आहे. सल्लागारांकडेही त्याची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा ती माहिती गोळा होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने एवढे मोठे धडधडीत आरोप कसे केले? त्याचे काय कारण, आम्हाला शंभर कोटीचा निधी आलाय का? साडेतीन वर्षे आमची सत्ताही नाही. आम्ही काही गोलमाल केले आहे काय? की एवढे दडविण्यासारखे व जाळण्यासारखे काय आहे? याउलट आमचे नगरसेवक प्रविण काळबर व इतरांचे मी अभिनंदन करीन की त्यांनी सीसीटीव्हीचे फुटेज असलेले डीव्हीआर मशीन सुरक्षित काढून पोलीसांच्या ताब्यात दिले. शॉर्टसर्किटमुळेच ही आग लागली असेल, अन्यथा हे कुणी केले? मला असे वाटते कागलमध्ये सध्या मोठमोठे बिल्डर्स आहेत. 

जळले की जाळले हे कळालेच पाहिजे 
कागलच्या एक चतुर्थांश मालकीच्या जमिनीत मोठे बिल्डरदेखील आहेत. काही जमीनीवर आरक्षण आहे. बांधकामाला त्यांनी परवानगी घेतलेली आहे. ती परवानगी खोटी कागदपत्रे दाखल करुन घेतली की काय? त्यासाठीच उपद्‌व्याच झाला असावा की काय? अशी शंका आहे. मी कुणाचेही नाव घेतलेले नाही. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. सीटीव्ही फुटेजमध्ये काय असेल ते जनतेपुढे आले पाहिजे. जो दोषी असेल "उसे बक्षा नही जायेगा". जळले की जाळले हे लोकांना कळालेच पाहिजे. 

यावेळी भय्या माने, उपनगराध्यक्ष नितीन दिंडे,पक्षप्रतोद प्रविण काळबर, आनंदा पसारे,सौरभ पाटील,बाबासो नाईक आदी उपस्थित होते. 

Web Title: Kolhapur News Hasan Mushrif Press