अंबाबाई देवीच्या हातातील म्हाळुुगापर्यंत पोहोचली किरणे

मोहन मिस्त्री
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मावळत्या सुर्यकिरणांनी देवीच्या मुर्तीच्या छातीपर्यंत स्पर्श केला. शुक्रवारी (ता. 10)  सायंकाळी पाच वाजुन 50 मिनिटांनी किरणांनी देवीच्या हातातील म्हाळुुगापर्यंत स्पर्श केला. यानंतर धूसर होत किरणे लुप्त झालीे. दुसऱ्या दिवशी किरणोत्सव झाला 

श्री अंबाबाइंच्या किरणोत्सवाला गुरुवारी सुरवात झाली. पहिल्या दिवशी कमरेपर्यंत किरणे पोहोचल्याने भकतांमध्ये समाधानाचे वातावरण होते. दुसऱ्या दिवशीही भक्त आणि अभ्यासकांमध्ये उत्सुकता होती. आज सुर्यकिरणांनी सायकाळी 5 वाजुन 24 मिनिटांनी महाद्वारातुन सुर्यकिरणांनी मंदिरातुन प्रवेश केला. त्यानंतर पाच सहा मिनिटांनी कासव चौकातुन आलेल्या किरणांनी पितळी उंबऱ्यातुन आत प्रवेश केला.या किरणांचा अभ्यास करण्यात येत हाता. यानंतर पाच वाजुन 47 मिनिटांनी किरणांनी देवीचा चरणस्पर्श केला. किरणे काहीशी अंधुक असली तरी सुर्यकिरणे पायापासुन पुढे कमरेवरुन पुढे सरकताना मंद झालेली किरणे हातावरुन पुढे मुर्तीच्या छातीपर्यंत पोहोचली. त्यांनंतर मंद झालेली किरणे लुप्त झाली. आज किरणांची तीव्रता कमी होती. 

किरणोत्सव पाहण्यासाळी कासव चौक आणि पितळी उंबरा चौकात नागरीकांची गर्दी होत असते. त्यामुळे अनेकदा किरणे पोहोचताना अतिउत्साही भक्तांच्या डोक्‍याचा अडथळा होत असे. त्यामुळे या चौकात बसण्यास भाविकांना मज्जाव करण्यात आला. आणि देवस्थान कार्यालयासमोर एलईडी स्क्रीनची व्यवस्था करुन लाईव्ह सोहळा पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. किरणे पोहेचण्यात येणारे काही अडथळे सकाळी देवस्थानच्यावतीने काढण्यात आले. उद्या सुर्यकिरणे मुर्तीच्या चेहलऱ्यापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा अभ्यासगटाकडून व्यक्त करण्यात आली. 

Web Title: Kolhapur News Kirnoushav in Ambabai Temple

टॅग्स