सुहासिनीदेवी घाटगे यांना कोरगावकर पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

कोल्हापूर - येथील स्वयंसिध्दा संस्थेचा 26 वा वर्धापनदिन शुक्रवारी (ता.15) विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. यंदाचा (कै) स्मिता कोरगावकर पुरस्कार श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांना दिला जाणार आहे. कागल परिसरातील महिला सक्षमीकरण आणि दिव्यांगांसाठी केलेल्या कामाबद्दल त्यांचा गौरव होणार आहे. दरम्यान, शाहू स्मारक भवनात दुपारी तीन वाजता पुरस्कार वितरण सोहळा होईल. 

डॉ. शोभना तावडे - मेहता आरोग्यम्‌ धनसंपदा पुरस्कार डॉ. विनोद घोटगे यांना दिला जाणार आहे. डॉ. घोटगे यांनी आरोग्य सेवा बजावताना विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. लेखक डॉ. सागर देशपांडे यांना मधुकर सरनाईक परिवर्तन दूत तर रजनी आणि अप्पासाहेब पाटील यांना (कै) माई तेंडूलकर यांच्या स्मरणार्थ मातृपितृ देवोभव पुरस्कार दिला जाईल. जन्मतःच पंग असलेल्या मीनाक्षी पाटील यांचे हे आई-वडिल असून मीनाक्षी यांना पाटील दांपत्यांने पदवीधर बनवून स्वेटर उद्योगात उभे केले आहे. 

मीना सामंत परिवर्तन दूत पुरस्कार महेश सुतार यांना दिला जाणार असून महेश कर्णबधीर, मतीमंद, गतीमंद मुलांना पंक्‍चर व सर्व्हिसिंगची कामे शिकवून स्वावलंबी बनवत आहेत. 
गारगोटीच्या स्वयंपूर्णा महिला संस्थेला राजलक्ष्मी तर रूपाली मोरे, मधुरिमा कांबळे यांना माणिकमोती पुरस्काराने गौरविले जाईल. समीधा दुधाणे, जान्हवी दळवी यांना अर्थसहाय्य केले जाईल तर मंदा आचार्य पुरस्कार करड्याळ (ता. कागल) येथील वर्षा कुंभार, सुप्रिया कुलकर्णी यांना दिला जाईल. 

दरम्यान, पत्रकार परिषदेला तृप्ती पुरेकर, सौम्या तिरोडकर, जयश्री गायकवाड, जयश्री शिरोळकर यांच्यासह व्ही. टी. पाटील फाऊंडेशन, स्वयंसिध्दा, स्वयंप्रेरिका संस्थेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. 

व्याजातून सव्वा लाख 
संस्थेकडे विविध देणगीदारांनी दिलेल्या देणगीच्या व्याजातून पुरस्कार दिले जातात. सर्व पुरस्कारांची एकूण रक्कम सव्वा लाख रूपये आहे. रणरागिणी ताराराणींच्या नावाने अनौपचारिक शिक्षण विद्यापीठ, स्वयंनिर्भरता संकुल, "उद्योजक उभा राहतो' प्रयोग आदी योजना भविष्यात संस्था राबवणार आहे. 

Web Title: Kolhapur News Korgaonkar award to Sudhsinidevi Ghatge