गव्यांच्या कळपाने तुडवल्याने आजऱ्यातील भूमिअभिलेखचा कर्मचारी जखमी

रणजित कालेकर
शुक्रवार, 23 मार्च 2018

आजरा - गव्यांच्या कळपाकडून तुडवले गेल्याने आजरा भूमिअभिलेख निरीक्षक कार्यालयाकडील कर्मचारी नितीन पाटील (वय 28) सध्या रा. आजरा, मुळगाव बांबवडे (ता. शाहुवाडी) हे गंभीर जखमी झाले. आज सकाळी पावणे नऊच्या सुमाराला आजरा हात्तीवडे रस्त्यावरील चाळोबाच्या बारीत हा प्रकार घडला.

आजरा - गव्यांच्या कळपाकडून तुडवले गेल्याने आजरा भूमिअभिलेख निरीक्षक कार्यालयाकडील कर्मचारी नितीन पाटील (वय 28) सध्या रा. आजरा, मुळगाव बांबवडे (ता. शाहुवाडी) हे गंभीर जखमी झाले. आज सकाळी पावणे नऊच्या सुमाराला आजरा हात्तीवडे रस्त्यावरील चाळोबाच्या बारीत हा प्रकार घडला.

पाटील हे मलिग्रे येथे जमिन मोजणीसाठी निघाले होते. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर जिल्हा रुग्णालयाकडे हलविण्यात आले आहे. या कळपात 9 गवे असल्याचे श्री. पाटील यांनी सांगीतले. 

श्री. पाटील हे आजरा भूमिअभिलेख कार्यालयाकडे भूकर मापक म्हणून कामाला आहे. ते आजऱ्यात राहतात. आज सकाळी ते मलिग्रे (ता. आजरा) येथील आनंदा चंद्रु कांबळे (जाधव) यांची जमिन मोजणी करावयास दुचाकीवरून निघाले होते.

आजरा हात्तीवडे रस्त्यावरील पेद्र्रेवाडी फाट्यानजिक चाळोबा बारीत गव्यांचा कळप अचानक त्यांच्या दुचाकी समोर आला. या कळपाने त्यांना गाडीसह धडक दिल्यांने ते रस्त्यावर पडले. त्यांच्या अंगावरून गव्यांचा कळप उड्या मारुन गेला. पायाखाली तुडवले गेल्यामुळे त्यांना गंभीर दुखापती झाली. त्यांच्या दोन पाय व हाताला व कंबरेला दुखापत झाली आहे.

त्यांनी याची माहीती भ्रमणध्वनीवरून कार्यालयीन सहकारी विवेक जाधव यांना दिली. त्यांनी मित्रांच्या मदतीने त्यांना आजरा ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. येथे प्राथमिक उपचार करून गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथून पुढे पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविले आहे. गाडीचेही नुकसान झाले आहे. वनविभागाचे अधिकाऱ्यांनी ग्रामिण रुग्णालयात भेट देवून श्री. पाटील यांची चौकशी केली.
चौकटीत घ्यावे.

रस्त्यावर गव्यांची दहशत
आजरा - आंबोली- गडहिंग्लज, आजरा - महागाव, आजरा- पेरणोली रस्त्यावर गव्यांचे कळप वावरत आहेत. हे कळप अचानक कधी गाडीसमोर येतील हे सांगता येत नाहीत. त्यांनी दशहत पसरवली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Land records staff injured in attack of Gava