मला शाहरूख खानचा नंबर द्या...

राजेश मोरे
सोमवार, 7 मे 2018

कोल्हापूर - किमती साडी परिधान केलेली, अंगात दागिने घातलेली एक महिला रिक्षातून शाहूपुरी पोलिस ठाण्यात आली. कोणालाही न विचारता तिने तेथे ठेवलेली खुर्ची ओढून त्यावर बसली. तिची काय तक्रार आहे, हे जाणण्यासाठी ठाणे अंमलदारासह अधिकारीही थोडे पुढे आले. टेबलावर रुबाबात हात ठेवून ती म्हणाली, मला शाहरूख खानचा नंबर द्या... तशा पोलिसांच्या भुवया उंचावल्या, त्यांनी पुन्हा प्रश्‍न केला काय पाहिजे, तर तिने पुन्हा उत्तर दिले मला शाहरूख खानचा नंबर द्या. तशी तिची मानसिकता पोलिसांनी जाणली. तिची समजूत काढून तिला नातेवाईकांकडे पाठवले. 

राजारामपुरी पोलिस ठाणे  ः
दोन लहान मुले घेऊन एक महिला राजारामपुरी पोलिसात आली. पिशवीतील शिरा, चिरमुरे काढून टेबलावर ठेवले. हा घ्या प्रसाद म्हणून तिने पोलिसांना दिले. त्यानंतर ती बाहेर गेली. हातात झाडू घेऊन परिसर लोटू लागली. आकाशाकडे पहात तिने शिव्या देण्यास सुरवात केली. तिची समजूत काढून महिला पोलिसांनी तिला शांत केले. तुला त्रास देणाऱ्याचा बंदोबस्त करतो, असे सांगून घरी पाठवले. 

जीवनातील अव्यावहारिकपणा, असंबंधपणा, इतरांपेक्षा मोठे असल्याचे दाखविण्याची आणि संशयी वृत्तीमुळे मानसिक रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्याचे वर्गीकरण आणि मोजमाप करणे कठीण आहे. अशा रुग्णांचे वेळीच मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार होणे गरजेचे आहे. 
- डॉ. सी. एम. चौगुले (
मानसोपचार तज्ज्ञ)

कायदा सुव्यवस्थेच्या जबाबदारीबरोबर पोलिस ठाण्यात येणाऱ्या मानसिक रुग्णांची समजूत काढून त्यांना घरी पोचविण्याचेही काम पोलिसांकडून जबाबदारीने केले जाते. 
- डॉ. प्रशांत अमृतकर
(शहर पोलिस उपअधीक्षक)

जुना राजवाडा पोलिस ठाणे 
उच्चभ्रू घरातील नऊवारी परिधान केलेली महिला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आली. साहेब ‘बाजीरावला’ पकडा. त्याने माझ सोनं, जमीन काढून घेतलीय. ती परत मिळवून द्या, मी तुम्हाला चहापाणी देतो, माझ्याबरोबर पोलिस पाठवा, असे वारंवार सांगू लागली. ठाण्यातील फोनवरून पोलिसांना घटनास्थळी जाण्याचे नाटक पोलिसांनी केले. ते महिलेला पटलं, ती घरी निघून गेली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Mental illness special story