घरोघरी बनला खवा अन्‌ पेढे

सागर चौगले
शुक्रवार, 20 जुलै 2018

माजगाव - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनामुळे माजगाव परिसरातील गावांत ३० हजार 
लिटर संकलन ठप्प झाले. तथापि खवा, बासुंदी, पेढे आदींची घरगुती पद्धतीने निर्मिती करून महिलांनी दुधाचा प्रश्‍न निकाली काढला. आंदोलनामुळे का होईना; पण बळीराजाच्या घरी दूध व दुग्धजन्य पदार्थांची रेलचेल आहे.

शेतकरी संघटनेने उभारलेल्या दूध बंद आंदोलनाला माजगावसह माळवाडी, शिंदेवाडी, खोतवाडी, देवठाणे (ता. पन्हाळा) आदी 
गावांत शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. दूध संस्थांच्या माध्यमातून होणारे दूध संकलन ठप्प आहे.

परिसरातील चार गावांत २२ सहकारी दूध संस्था संकलन करतात. हे दूध प्रामुख्याने गोकुळ व वारणा संघाकडे पाठविले जाते. प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे, यासाठी दूध बंद आंदोलनाला उत्पादकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. त्यामुळे घरी राहिलेले दूध चुलीवर आटवून खवा, बासुंदी, पेढे, पनीर, बर्फी, गुलाबजाम आदी दुग्धजन्य पदार्थ बनविण्यात घरोघरच्या अन्नपूर्णांनी सक्रिय आघाडी घेतली. घराघरांतून दुग्धजन्य पदार्थांची रेलचेल असून, त्याचा मनमुराद आस्वाद लेकरे-बाळे घेत आहेत.

दूध बंद आंदोलनामुळे चार दिवस पै-पाहुण्यांना दुधाचे वाटप केले. राहिलेल्या दुधाचा खवा, बासुंदी, पेढे आदी पदार्थ केले. काही प्रमाणात दूध नदीत टाकले. चार दिवसांचे दूध बिल बुडून नुकसान झाले; पण आंदोलनामुळे दुधाचा दर वाढला, हे ऐकून आनंद झाला.
- निशा निवास दिंडे,
दूध उत्पादक

जनावरांच्या संगोपनासाठी पशुखाद्य लागते. दूध संकलन बंद असल्याने पशुखाद्याची थकबाकी वाढेल. त्याचा फटका दूध उत्पादकांना बसणार आहे.
- बाजीराव कदम, 

   सचिव, दत्त दूध संस्था, माजगाव

व्यावसायिक मालामाल
खासगी दूध व्यवसाय करणाऱ्यांकडून निम्म्या दरात फक्त म्हशीचे दूध खरेदी करून दुग्धजन्य पदार्थ तयार करून विक्रीसाठी नेले. दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे व्यवसायिक मालामाल झाले.

Web Title: Kolhapur News Milk agitation