पत्नीचा खून करून निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

नितीन जाधव
मंगळवार, 30 जानेवारी 2018

कोल्हापूर -  येथील देवकर पाणंदमध्ये पत्नीचा खून करून निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बबनराव बोबडे ( वय 65,  विश्वकर्मा कॉम्प्लेक्स , फ्लॅट नं. ५०३ देवकर पाणंद ) असे त्या निवृत पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बबनराव बोबडे हे पत्नी रेखा यांच्यासह देवकर पाणंद येथे मनीषा एम. घोटगे यांच्या फ्लॅटमध्ये एक वर्षापासून भाड्याने राहात होते. आठ वर्षापूर्वी ते मुंबई येथून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना
दोन मुले असून एक मुलगा संतोष हा एअर फोर्टमध्ये तर दुसरा सचिन हा हॉटेलमध्ये कुक आहे. 

देवकर पाणंदमध्येच निलकमल अपार्टमेंटमध्ये त्यांच्या चुलत पुतणीचा मुलगा महेश सुरेश अडसुळे राहतात. यांच्या घरी बबनराव नेहमी सकाळी येत होते. आज ते सकाळी न आल्याने त्यांच्या मोबाईलवर फोन केला मात्र त्यांनी तो उचलला नाही. म्हणून पाहणी केली. यावेळी या घटनेचा उलघडा झाला. बेडरूम मधील बेडवर पत्नीसह स्वतः त्यांनी गोळ्या झाडून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून तपास सुरू आहे. 

Web Title: Kolhapur News murder and suicide incidence in Devkar Panand