काळा चष्मा बनला दैनंदिन गरज

काळा चष्मा बनला दैनंदिन गरज

कोल्हापूर - स्टाईल स्टेटस म्हणून असणारा चष्मा (गॉगल) आता मात्र सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा घटक बनला आहे. कडक उन्हाळा, धूळ यामुळे डोळ्यांची काळजी घेणे हे गरजेचे झाले आहे. ह्या बदलाचा भाग होताना कोल्हापूरमध्ये गॉगलची मोठी बाजारपेठ स्थिरावली आहे. ऐशी रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंतचे मॉडेल सध्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

कशापासून बचाव करेल?
गॉगल किंवा सनग्लासेस हे प्रामुख्याने डोळ्याचे प्रखर सूर्यप्रकाशापासून रक्षण करण्यास मदत करतात. सूर्यप्रकाशामुळे वेदना, डोकेदुखी तसेच दीर्घकालीन प्रभावामुळे मोतीबिंदू तसेच रात्रीचे अंधत्व अशा गोष्टींचा समावेश आहे. 

सनग्लासेस लेन्सचे प्रकार  
फायबर तसेच काचेचे लेन्स असणारे गॉगल सध्या उपलब्ध आहेत. फायबर, वूडन, ॲक्रॅलिक, मेटल यामध्ये फ्रेम्स उपलब्ध आहेत. यामध्ये स्वस्त मॉडेल्स ते महागडे डिझाईनर ब्रॅंडससह विविध प्रकारच्या शैली आणि किमतींमध्ये उपलब्ध आहेत. 

गॉगल हे मुख्यत्वे अतिनील किरणे, धूळ व वारा या तिहेरी गोष्टींपासून डोळ्यांचा बचाव करतात. अतिनील किरणे रॅटीना डॅमेज करू शकतात, धूळ डोळ्यात गेल्याने जखम होऊ शकते. वारा डोळे कोरडे करतो. त्यामुळे जळजळते व डोळे लाल होतात. नेहमी चांगल्या प्रतीचा गॉगल वापरावा तसेच रात्री चष्मा वापरावा. 
- डॉ. वैशाली सोनवणे,
नेत्रोपचार तज्ज्ञ

गॉगलचे प्रकार 
गॉगलचे मुख्य १२ प्रकार आहेत. जे त्याच्या रचना आणि आकारावरून पडले आहेत. 

एव्हिएटर, राऊंड, वेयफरर स्टाईल, कॅट आय, ओव्हल, ओव्हर साईझ्ड, बटरफ्लाय, रेक्‍टॅंग्युलर, स्पोर्टस्‌, क्‍लब मास्टर, स्क्वेअर, शिल्ड हे मुख्य प्रकार आहेत तर याच बरोबर काही छोट्या बदलामुळे अनेक उपप्रकार आहेत. 

कसा निवडावा गॉगल? 

  • गॉगल निवडताना प्रामुख्याने तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. शेप, साईज व लेन्स. 
  • शेप (आकार) हा फार महत्त्वाचा आहे. चेहऱ्याला योग्य पद्धतीने सूट होईल असा आकार निवडावा. 
  • साईज निवडताना चेहऱ्याची ठेवण लक्षात घ्यावी. खूप मोठा किंवा छोटा गॉगल निवडू नये. डोळे संपूर्ण झाकले जातील असा आकार निवडावा. मेटल फ्रेम निवडताना नाकावरील दाब लक्षात घ्यावा. 
  • लेन्स निवडताना बारकाईने लक्ष द्या. दुकानांमध्ये असणाऱ्या ट्यूबलाईटचे प्रतिबिंब गॉगलमध्ये पहा. जर लेन्समध्ये ट्यूबलाईट व्यवस्थित दिसत असेल तर लेन्स चांगली आहे ओळखावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com