विनयभंग प्रकरणी रागोळीतील एकास अटक

राजेंद्र होळकर
सोमवार, 25 जून 2018

इचलकरंजी - रांगोळी येथील मुल्लाणीवाडीमधील तरुणाने एका विवाहितेचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत महिला संबंधीत आरोपीविरोधी पोलिसात फिर्याद देण्यासाठी आली. त्यावेळी विनयभंग करणारा आरोपी व त्याचा मुलग्यासह पाच जणांनी पिडीत महिलेसह तिच्या घरच्यांना पोलिस ठाण्याच्या आवारात शिवीगाळ आणि धक्काबुक्की करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी पोलिसानी विनयभंग करणारा बालम सरदार मुल्लाणी या आरोपीसह मुलगा सोहेल सरदार मुल्लाणी, नातेवाईक सुरज बाळासो जमादार, तैमुर दादुलाल मुजावर, अझरुद्दीन हारुण मुल्लाणी (सर्व रा. मुल्लाणीवाडी, रांगोळी, ता.हातकणंगले) यांना अटक केली. त्याचबरोबर सोहेल मुल्लाणी, सुरज जमादार, तैमुर मुजावर, अझरुद्दीन मुल्लाणी यांना पोलिस खाक्‍या दाखवित त्यासर्वाना आज दुपारपर्यत पोलिस ठाण्यात कानगड्डे धरुन बसायला लावले.

रांगोळी-हुपरी रस्त्यावरील मुल्लाणीवाडी नजीक पाण्याच्या नळावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेबरोबर रांगोळी मुल्लाणीवाडी येथील बालम मुल्लाणी यांने लज्जा उत्पन्न होईल असे कृत केले. या प्रकारानंतर पिडीते महिलेने घरच्यांना माहिती दिली. पिडीत महिला आणि तिचे घरची मंडळी येथील शिवाजीनगर पोलिसात फिर्याद देण्यासाठी गेले यावेळी हा प्रकार घडला. 

पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी बालम मुल्लाणी याला अटक केली आहे. तर सार्वजनिक ठिकाणी दंगा केल्याप्रकरणी सोहेल मुल्लाणी, सुरज जमादार, तैमुर मुजावर, अझरुद्दीन मुल्लाणी या चौघाना अटक केली. त्याच्याविरोधी कॉन्स्टेबल प्रविण कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. 

Web Title: Kolhapur News one arrested in Molestation case