इचलकरंजीत यंत्रमागांचा खडखडाट पुन्हा सुरू.

संजय खुळ
सोमवार, 14 मे 2018

इचलकरंजी -  तब्बल ७२ तास 350 कर्मचाऱ्यांच्या  योगदानातून व अथक परिश्रमानंतर रविवारच्या सायंकाळपासून बहुंताश भागातील इचलकरंजी व परिसरात यंत्रमागांचा खडखडाट सुरू झाला. या तीन दिवसांत वीज कर्मचाऱ्यांनी रात्रं-दिवस केलेल्या कामाचे व जनतेने दाखवलेल्या संयमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इचलकरंजी -  तब्बल ७२ तास 350 कर्मचाऱ्यांच्या  योगदानातून व अथक परिश्रमानंतर रविवारच्या सायंकाळपासून बहुंताश भागातील इचलकरंजी व परिसरात यंत्रमागांचा खडखडाट सुरू झाला. या तीन दिवसांत वीज कर्मचाऱ्यांनी रात्रं-दिवस केलेल्या कामाचे व जनतेने दाखवलेल्या संयमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शुक्रवारी सायंकाळी वादळी महावितरण यंत्रणा कोलमडून गेली. इचलकरंजी व जयसिंगपूर विभागातील सर्वच ३३  वीज उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद झाला. दोन तासांनंतर वीज कर्मचारी कामाला लागले. अब्दुललाट, शिरदवाड व चंदूर वगळता सर्व 33 केव्ही उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा मध्यरात्रीपर्यंत टप्या -टप्प्याने सुरू करण्यात यश आले. पहिल्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत सलग काम चालले.

महावितरण पुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून इचलकरंजी विभागाला लागणारे विजेचे खांब, इतर साहित्य व मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करुन दिले. मुख्य अभियंता किशोर परदेशी, प्रभारी अधीक्षक अभियंता    सागर मारुलकर यांच्याशी संवाद साधूनपरिस्थिती नियंत्रणात ठेवली. 

 बंद पडलेल्या 11 केव्हीच्या 105 वाहिन्यांपैकी (फिडर) 53 वाहिन्या शुक्रवारीच  सुरू करण्यात आल्या. तर 53 पैकी 38 वाहिन्या शनिवारी व उर्वरित रविवारी सुरू करण्यात आल्या लघुवाहिन्यांचे कोसळलेले खांबही तीन दिवसांत बदलण्यात आले. तर अजूनही काही खांब बदलण्याचे काम सुरू आहे.
परंतु शहर व गावठाण हद्दीतील वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरळीत करताना दवाखाने, पाणीपुरवठा योजनांना प्राधान्य देण्यात आले.

इचलकरंजी नगर परिषदेनेही झाडे हटविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. प्रभारी कार्यकारी अभियंता श्री. मकरंद आवळेकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सौ. तृप्ती दिपंकर, सर्व उपविभागीय अधिकारी, शाखा अभियंते व जनमित्र यांनीही
अथक परिश्रम घेत आपत्कालिन परिस्थितीवर मात केली.

Web Title: Kolhapur News powerloom starts in Ichalkaraji