मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत संघटनेचे सरकारविरोधात आंदोलन

राजेंद्र होळकर
सोमवार, 18 जून 2018

इचलकरंजी - " एक रुपयांचा कडीपत्ता, सरकार झाले बेपता " अशा घोषणा सरकारविरोधी पक्षाच्या मोर्चातील नसून त्या होत्या, राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती शेत मजुर संघटनेने आज प्रांतकार्यालयावर काढलेल्या मोर्चातील आहेत . या घोषणा ऐकून नागरिकांच्यात संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

इचलकरंजी - " एक रुपयांचा कडीपत्ता, सरकार झाले बेपता " अशा घोषणा सरकारविरोधी पक्षाच्या मोर्चातील नसून त्या होत्या, राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती शेत मजुर संघटनेने आज प्रांतकार्यालयावर काढलेल्या मोर्चातील आहेत . या घोषणा ऐकून नागरिकांच्यात संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

संघटनेने शिरोळ तालुक्‍याचे तहसिलदार गजानन गुरव यांच्याकडे संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजनेसाठी लागणारे परिपुर्ण कागदपत्रे जमा केली आहेत. तरीदेखील त्यांच्या कार्यालयातून या योजनेच्या पात्रताधारकांचे दोन वर्षापासून कागदपत्रे गहाळ होत आहेत. याप्रकरणाची चौकशी होवून, संबंधीताच्यावर कारवाई व्हावी. त्याचबरोबर पात्रताधारकांचे अर्ज मंजुर करुन त्यांना या योजनेची पेन्शन मिळावी, यामागणीसाठी प्रांतकार्यालयावर आज मोर्चा काढला. या मोर्चात सरकार आणि अधिकाऱ्यांच्या विरोधी घोषणा दिल्या जात होत्या.

या मोर्चाचे नेतृत्व पश्‍चिम महाराष्ट्र रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासणे, जिल्हा संपर्क प्रमुख सुरेखा काटकर, जिल्हा सरचिटणीस विनायक कलढोणे आदींने केले. या मोर्चामध्ये वयोवृध्द महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मोर्चाला येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरुवात झाली. मोर्चा शहरातील मुख्य मार्गावरुन फिरुन प्रांत कार्यालयावर आला.

यावेळी पोलिसांनी मोर्चा कार्यालयाच्या मुख्य गेटवर अडविला. मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणा बाजी करीत गेट ढकलुन देत कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी मोर्चेकऱ्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला. याचदरम्यान काही मोर्चेकऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून त्यांच्या बरोबर वाद घातला. याप्रकारांने या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांनी अडविल्याने मोर्चेकऱ्यांनी गेट समोर शंखध्वनी करीत ठिय्या आंदोलन सुरु केले. यांची दखल घेवून प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेवून त्यांचे म्हणे ऐकून घेतले. त्यांनी शिरोळ तालुका तहसिल कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी लक्ष्य घालुन आठवडाभरात ज्या व्यक्तीची संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजनेसाठी लागणारे परिपुर्ण कागदपत्रे जमा केली आहेत. त्यांचे अर्ज मंजुर करण्याबाबत सांगितले.

Web Title: Kolhapur News Rayat organisation agitation against Goverment