मामांच्या गावात होणार शरद पवार यांचे स्वागत 

गोलीवडे : येथे शरद पवार यांच्या स्वागतासाठी मंडप उभारण्याचे काम सुरू आहे 
गोलीवडे : येथे शरद पवार यांच्या स्वागतासाठी मंडप उभारण्याचे काम सुरू आहे 

माजगाव - मामाच्या गावाचा जिव्हाळा आणि ओढ प्रत्येकाच्या मनात असते. अशीच ओढ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय शरद पवार यांना देखील लागली आहे. " मामाच्या गावच्या" उत्सुकतेपोटी रविवारी (ता. 11) ते गोलीवडे (ता. पन्हाळा) येथे ते  भेट देणार आहेत.

श्री पवार यांच्या स्वागताची ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे. घरोघरी रांगोळी काढून, प्रत्येकाच्या दारी गुढ्या उभा केल्या जाणार आहेत. फुलांची स्वागत कमान, सुमारे 400 महिला नऊवारी साड्या व मुली हिरव्या रंगाच्या व ड्रेस परिधान करून श्री.पवार यांचे औक्षण करणार आहेत. पुरुष मंडळी कोल्हापुरी फेटे नेसून पवार यांच्या स्वागतासाठी सज्ज राहणार आहेत. झांजपथकाच्या निनादात गावच्या वेशीपासून स्वागत मिरवणूक निघणार आहे. 

भव्य मंडपही उभा करण्यात आला आहे. येणाऱ्या पाहुण्यासाठी भारतीय बैठकची व्यवस्था आहे. वाहनांसाठी खास पार्किंगची सोय आहे.  गावात युध्दपातळीवर स्वच्छता मोहिम, रस्ते दुरूस्ती सुरू आहे. 

शरद पवार हे आमच्या गावचे भाचे आहेत. याचा आम्हा ग्रामस्थांना अभिमान वाटतो. त्यांनी मामाच्या गावाला भेट द्यावी. अशी अनेक वर्षांपासून आमची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण होत आहे. त्यांनी येथून पुढे सुद्धा असाच जिव्हाळा जपावा हीच गावकऱ्यांची अपेक्षा आहे.
- नंदा चेचर,
 सरपंच, गोलीवडे. 

ग्रामदैवत भैरवनाथाची प्रतिकृती असणारी दीड किलोची चांदी मूर्ती श्री. पवार यांना भेट देऊन त्यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार होणार आहे. श्री. पवार यांच्या स्वागताची जोरदार तयारी ग्रामस्थांनी केली आहे. 

या आदर्श गावचे सुपूत्र कृष्णराव भोसले यांच्या पोटी शरद पवार यांच्या माताश्री शारदाबाई यांचा जन्म झाला. सन 1911 च्या दरम्यान भोसले कुटुंब कामानिमित्त कोल्हापूर येथे स्थायिक झाले आहे. मामाच्या गावची ओढ आणि उत्सुकतेने श्री. पवार या गावाला रविवारी सकाळी नऊ वाजता भेट देणार आहेत. आणि ग्रामस्थांबरोबर ते विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. या दरम्यान ते जिल्हा बॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या आसुर्ले गावी घरी भेट देणार आहेत. 

20 वर्षे बिनविरोध निवडणूक, एक गाव गणपतीची परंपरा.. 

पन्हाळा गडाच्या पायथ्याशी निसर्गरम्य गोलीवडे गावची वाटचाल योगी प्रभुनाथ महाराज ( कात्यायनी कळंबा) यांच्या आध्यत्मिक विचाराने सुरू आहे. गावच्या विकासाच्या दृष्टीने गेली वीस वर्षे ग्रामपंचायत व सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध होते. गावची यात्रा शाकाहारी असते. ग्रामदैवत भैरवनाथाची जयंती नोव्हेंबर डिसेंबरमध्ये साजरी केली जाते. 
यावेळी सलग नऊ दिवस महाप्रसादाचे वाटप केले जाते. लोकवर्गणीतून लहान मोठी 10 मंदिरे ग्रामस्थांनी बांधली आहेत. योगी प्रभुनाथ महाराज फोऊंडेशनचे सामाजिक कार्यसुद्धा कौतुकास्पद आहे. 

शाळेला शारदाबाई पवार यांचे नाव देण्याचा प्रस्ताव 

गावातील सुमारे 80 तरुणांचे झांजपथक बिदागीत मिळणारे पैसे गावच्या विकासाठी खर्च करते. लोकवर्गणीतून प्राथमिक शाळा डिजिटल करण्याचे काम सुरू आहे. या शाळेला शरद पवार यांच्या मातोश्री कै. शारदाबाई पवार यांचे नाव देण्यासाठी ग्रामस्थांनी शासनस्तरावर प्रस्ताव दिला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com