शाहुवाडी तालुक्यात अपघातात पुण्याचे सहाजण ठार

नितीन जाधव
शनिवार, 27 जानेवारी 2018

कोल्हापूर -  रत्नागिरी मार्गावर शाहूवाडी तालुक्यातील तळवडे येथे मोटार (एमएच ११ एडब्लू ६६०० ) झाडावर आदळून अपघात झाला. यामध्ये सहाजण ठार झाले आहेत. मृतांमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. 

कोल्हापूर -  रत्नागिरी मार्गावर शाहूवाडी तालुक्यातील तळवडे येथे मोटार (एमएच ११ एडब्लू ६६०० ) झाडावर आदळून अपघात झाला. यामध्ये सहाजण ठार झाले आहेत. मृतांमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. 

हा अपघात शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास झाला. मोटारीत एकूण आठजण होते. हे सर्वजण गणपतीपुळे येथे जात होते. तळवडे गावाजवळ एका झाडावर त्यांची मोटार आदळली. अपघातामध्ये पाचजण जागीच ठार झाले तर मोटार चालकाचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 

मृतांची नावे अशी  

प्रशांत सदाशिव पाटणकर, मोटार चालक  (वय - ४० रा. भागीरथी हाऊस, पिंपळे गुरव ,पुणे ),  संतोष त्रिंबक राऊत (वय - ३७), स्नेहल संतोष राऊत (वय - ३२), स्वानंद संतोष राऊत (वय - ५ ) हे सर्व रा.शेवाळेवाडी ,हडपसर, पुणे तर  दीपक बुधाजी शेळकंदे (वय ४०,  रा . ८४/१/२ साई पार्क लक्ष्मीसुपर मार्केट समोर दिघी पुणे ),  प्रणव दीपक शेळकंदे (वय ३)

या अपघातामध्ये वरूणा दीपक शेळकंदे (वय - ४०), यदन्या दीपक शेळकंदे (वय - ३) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: Kolhapur News Six dead in an accident