अतिक्रमण निर्मूलन कारवाईच्या विरोधात आत्मदहनाचा प्रयत्न

विकास कांबळे
गुरुवार, 15 मार्च 2018

कोल्हापूर - अतिक्रमण निर्मूलन कारवाईच्या विरोधात आत्मदहन करण्याचा प्रयत्न आज सकाळी भोसलेवाडीत घडला. 

कोल्हापूर - अतिक्रमण निर्मूलन कारवाईच्या विरोधात आत्मदहन करण्याचा प्रयत्न आज सकाळी भोसलेवाडीत घडला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  भोसलेवाडी येथील कुंडलिक महादेव कोटकर यांनी जादाचे बांधकाम केले आहे. या बांधकामाबाबत लोकशाही दिनात आलेल्या तक्रारीच्या आधारे ते हटविण्याचे आदेश आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिले. त्यानुसार ताराराणी विभागीय कार्यालय व नगररचना विभागाने जादाचे बांधकाम काढण्याची कारवाई आज सुरू केली. या कारवाईस, कोटकर कुटुंबाने तीव्र विरोध केला. त्यांच्या एका मुलाने रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे या परिसरात काही काळ तणाव झाला. यामुळे ही कारवाई थांबविण्यात आली.

याबाबत महापालिकेच्या सुत्राकडून मिळालेली माहिती अशी , भोसले वाडी येथील अ‍ॅपल हॉस्पिटल जवळ सिसनं ६०८/२ या मिळकतीमध्ये कुंडलिक कोटकर यांनी दोन मजली (जी प्लस वन) घर बांधले आहे. कोटकर यांनी या बांधकामाची महापालिकेकडून रितसर परवानगी घेतलेली नाही. शिवाय सेटबॅकसाठी सोडावयाच्या जागेत जीना व एक रुमचे बांधकाम केले आहे. त्यामुळे शेजारील इमारतींना मिळणारा सुर्यप्रकाश रोखला गेला.  

याबाबत शेजारील मिळकत धारकांनी लोकशाही दिनात आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचेकडे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करुन आयुक्तांनी सेटबॅकमध्ये येणारे अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. यानुसार आज सकाळी नगररचना विभागाने सकाळी दहा वाजता कारवाई सुरु केली.  

यावेळी तीव्र विरोध करीत कोटकर यांनी महापालिकेच्या कारवाईस न्यायालयाने स्थगिती दिल्याचे सांगितले. याबाबतची रितसर कागदपत्रे सादर करा, असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. यानंतर महापालिका व त्यांच्या विधीतज्ज्ञांशी बोलल्यानंतर अशा प्रकारची स्थगिती आदेश नसल्याचे कळले.

Web Title: Kolhapur News Suicide attempt against encroachment eradication action