मुलीला चटके दिलेल्या प्रकरणातील आरोपी महिलेच्या आईची आत्महत्या

राजेंद्र होळकर
बुधवार, 13 जून 2018

इचलकरंजी - सावत्र मुलीला मारहाण व चटके दिल्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या विवाहितेच्या आईने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे घटना आज सकाळी उघडकीस आले. यांची नोंद शहापूर पोलीसात झाली आहे. सरस्वती महादेव पाटील ( वय ५५, रा.रत्नदीप वसाहत, गंगानगर, कोरोची ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

इचलकरंजी - सावत्र मुलीला मारहाण व चटके दिल्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या विवाहितेच्या आईने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सरस्वती महादेव पाटील ( वय ५५, रा.रत्नदीप वसाहत, गंगानगर, कोरोची ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची नोंद शहापूर पोलीसात झाली आहे.

प्रेमामध्ये अडथळा होत असल्याच्या कारणावरुन आठ वर्षीय चिमुकलीला जन्मदाता पित्याने आणि तिच्या सावत्र आईने शारिरीक छळ करुन तिला तापविलेल्या उलथनाने चटके दिल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. त्याप्रकरणामध्ये आरोपी असलेल्या संबंधीत मुलीची सावत्र आई रेश्मा रमेश जगताप (मुळ रा.हसणे, ता.राधानगरी, सध्या रा.गंगानगर) ही आरोपी आहे. तिची आई सरस्वती महादेव पाटील हिने राहत्या घराच्या आतील खोलीत पहाटेच्चा सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची माहिती समजताच शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी आले. त्यानी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेनासाठी येथील आयजीएम रुग्णालयात पाठविला आहे.

Web Title: Kolhapur News Suicide incidence in Ichalkaranji